आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गैरसमजांमुळे बिघडू शकते तुमचे आरोग्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला निरोगी राहायचे असते. मात्र अनेकदा लोकांचे आरोग्याविषयी सल्ले ऐकून तब्येत सुधारण्याऐवजी खराब होते. काही लोक ऐकलेल्या गोष्टी सांगत असतात. त्यात त्यामुळे चांगले आरोग्य बिघडते. अशा परिस्थितीत काही मिथक आणि त्याची सत्यता जाणून घेतली पाहिजे आणि मगच निर्णय घ्यायला हवा.

गैरसमज : सुंदर दिसण्यासाठी झीरो साइज

सत्य : पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे झीरो साइज. हा काही शरीराचा आकार नाही. तो फक्त कपड्यांचे मोजमाप करण्यासाठी वापरला जातोे. चित्रपट किंवा मासिकांमध्ये नायिकांसाठी तो वापरला जातो, तो पाहणे किंवा वाचण्यातच चांगले वाटते. मात्र काही लोक झीरो साइजसाठी खाणेपिणे सोडून देतात. त्यामुळे नको ते आजार होता. अशा परिस्थितीत आरोग्य बिघडते.

गैरसमज : ताण पडत नसलेल्या व्यायामाचा फायदा नाही

सत्य : व्यायामादरम्यान त्रास होत असेल तर तो व्यायाम चांगला, असा अर्थ मुळीच लावू नये. व्यायामादरम्यान जोरात श्वास घेणे किंवा घाम येणे ही चांगली गोष्ट असते. मात्र व्यायाम करताना एखादे अवयव ताणले गेले आणि वेदना होत असेल तर दुर्लक्ष करू नये. काही प्रमाणात शरीर ताण सहन करते, परंतु जास्त ताण पडला किंवा नसा ताणल्या गेल्या तर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.

गैरसमज : कार्बोहायड्रेट शरीरासाठी महत्त्वाचे नाहीत

सत्य : बाॅडी बनवण्यासाठी शरीरात कार्बोहायड्रेटची पुरेसी मात्र हवी असते. कोणतेही काम किंवा व्यायाम करण्यासाठी शरीरात ताकद आणि ऊर्जा यामुळेच मिळते. शरीरात पुरेसे कार्बोहायड्रेट्स असले तर शरीरातील फॅट लवकर कमी होते आणि शरीर व्ही आकारात येते. तसेच मेंदूसाठीदेखील कार्बोहायड्रेट्स महत्त्वाचे आहेत.