आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंघोळ करताना तुम्ही हे काम तर करत नाही ना? जाणून घ्या दुष्परिणाम...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण नेहमीच बाथरूमचा वापर करतो. शरीरासंबंधी अनेक गोष्टी आपण येथेच करत असतो. या काळात आपण अनेक चुकाही करतो. ज्याचा आपल्या शरीरावर वाईट प्रभाव पडत असतो. डर्मो वर्ल्ड स्किन अँड केअर क्लिनिक नवी दिल्लीचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रोहित बत्रा बाथरूममध्ये केल्या जाणाऱ्या चुकांविषयी सांगणार आहेत. या चुकांमुळे आपल्या शरीरावर वाईट प्रभाव पडत असतो. 


अंघोळ करताना तुम्ही हे तर करत नाही ना ही काम? 
शॉवरच्या प्रेशरमध्ये चेहरा स्वच्छ करणे 
नुकसान
: शॉवरमधून प्रेशरने येणाऱ्या पाण्यामुळे चेहऱ्याच्या चांगल्या त्वचेला आणि डोळ्यांना नुकसान होऊ शकते. 


खूप थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करणे 
नुकसान
: केस आणि त्वचेचे टिश्यूज खराब होऊ शकतात. त्वचा जळू शकते किंवा तजेला जाऊ शकतो. 


जास्त वेळ शॉवर घेणे 
नुकसान
: यामुळे त्वचेचे मॉइश्चर कमी होऊ शकते. त्वचा कोरडी पडून त्वचेवर सुरकुत्याही पडू शकतात. 


बॉडी स्क्रबर बाथरूममध्ये सोडणे 
नुकसान
: ओल्या बॉडी स्क्रबरमध्ये हानिकारक बॅक्टेरिया निर्माण होतात. हे त्वचा आणि शरीरात संसर्ग निर्माण करू शकतात. 


खूप जास्त स्क्रब करणे 
नुकसान
: जास्त गोरे होण्यासाठी काही लोक जास्त स्क्रब करतात. यामुळे त्वचेच्या वरचा थर निघू शकतो. यामुळे संसर्ग होऊ शकते. 


केमिकल असलेल्या साबणाचा वापर 
नुकसान :
मेडिकेटेड किंवा केमिकल असलेल्या साबणामुळे त्वचेचे संसर्गापासून रक्षण करणारे चांगले बॅक्टेरियाही नष्ट होतात. 

बातम्या आणखी आहेत...