आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भवितव्याचा आधार मजबूत करू शकतात गुगलचे हे प्रोग्राम्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलची ओळख जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी आहे; परंतु ही कंपनी असे अनेक प्रोग्रामही राबवते, ज्यांच्या मदतीने संपूर्ण जगातील विद्यार्थी स्वत:ची विविध कौशल्ये अधिक चांगली करून स्वत:ला जॉब मार्केटसाठी तयार करून नवी कौशल्ये शिकण्यासाठी विविध प्रकारचे साहाय्यही मिळवू शकतात, हे तुम्हाला ठाऊक आहे काय? ही कंपनी असे अनेक प्रोग्राम्स, शिष्यवृत्ती स्पर्धा, इव्हेंट्स व स्पर्धांचे आयोजन करते, ज्यामुळे जगातील अनेक देशांतील विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य अधिक मजबूत करण्यास मदत मिळत आहे. तुम्हीदेखील या  प्रोग्राम्समध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर तुम्हाला त्यांची माहिती असणे आवश्यक आहे...

 

स्कॉलरशिप्स व ट्रॅव्हल ग्रँट
तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर गुगल विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती व अनुदान देते. या माध्यमातून तुम्ही केवळ जगभरातील चांगल्या विद्यापीठांतच शिक्षण घेऊ शकत नाहीत, तर जॉब मार्केटमध्ये स्वत:ला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवू शकता. गुगलच्या शिष्यवृत्तींमध्ये ‘व्यंकट पंचपाकेसन मेमोरियल स्कॉलरशिप’ व ‘वुमन टेकमेकर स्कॉलर्स प्रोग्राम’ हे दोन मुख्य प्रोग्राम्स आहेत. हे प्रोग्राम्स भारतीय विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन देतात. गुगलतर्फे जगभरात विविध काॅन्फरन्सेस (परिषदा) व प्रवास शिष्यवृत्तीही दिली जाते. यांच्या मदतीने देश-विदेशातील मोठमोठ्या परिषदांत सहभागी होऊ शकता. यासाठी कॉन्फरन्सची नोंदणी, प्रवास, निवास व इतर खर्चासाठी १ ते ३ हजार अमेरिकी डॉलर्सपर्यंतचे अवॉर्डही दिले जातात. 

 

बिझनेस व टेक्निकल इंटर्नशिप्स
या प्रोग्राम्सच्या अंतर्गत गुगलतर्फे विद्यार्थ्यांना जगातील विविध भागांत काम करण्यासह शिकण्याची संधी दिली जाते. यातून विविध प्रकारचे बॅकग्राउंड्स असलेले पदवीधर-उमेदवार उद्योग-व्यवसाय, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात इंटर्नशिपचा फायदा घेऊ शकता. या इंटर्नशिप्सच्या माध्यमातून विद्यार्थी व्यवसायाचा विस्तार करणे, युजर्सना सर्वात पुढे ठेवणे किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगपासून त्यांचा अनुभव अधिक चांगला करण्यासह अनेक प्रकारची नवनवीन कौशल्ये शिकू शकता. 

 

इंडिया आऊटरीच प्रोग्राम्स
संगणक विज्ञान किंवा संबंधित क्षेत्रांत वर्ल्ड क्लास संशोधनासाठी मदतीकरिता गुगलतर्फे हा प्रोग्राम्स सुरू करण्यात आला आहे. 

 

स्टुडंट ट्रॅव्हल ग्रॅंट‌्स प्रोग्राम :

यातून अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते, ज्यांचे शोधनिबंध फॅकल्टी रिसर्च अवॉर्ड‌्स प्रोग्राम : संगणक विज्ञान व अभियांत्रिकी  यासारख्या क्षेत्रांत जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानविषयक संशोधनासाठी आर्थिक निधी दिला जातो. 

 

गुगल इव्हेंट्स
गुगल कंपनी केवळ कॅम्पस व्हिजिटपासून कॉन्फरन्सेस, सिम्पोझियम व नेटवर्किंग अशा प्रकारचे कार्यक्रमच आयोजित करत नाही, तर त्यात सहभागीही होते. यापैकी काही विशेष इव्हेंट्स असे आहेत...


- ऑनलाइन मार्केटिंग चॅलेंज : यात एक विद्यार्थी म्हणून तुम्ही गुगल अॅड ग्रँट्स प्रोग्राम मार्केटिंगसाठी धोरण तयार करणे व त्याच्या जाहिरात मोहिमांचे संचालन करणे शिकू शकता.
- गुगल स्टुडंट्स यूट्यूब लाइव्ह प्लेलिस्ट : या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘@GoogleStudents’ नावाच्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह इव्हेंट्स व गुगलच्या भूमिकेसह निवडीसंदर्भाची सत्रेही पाहू शकता. 
- कॅम्पस इव्हेंट्स : गुगलतर्फे जगभरातील शेकडो विद्यापीठांना भेटी देण्यासह तेथे सादरीकरणही केले जाते. तसेच करिअर फेअरमध्ये सहभागी होऊन  विद्यार्थ्यांशी संपर्कही साधला जातो. तुम्हीही तुमच्या महाविद्यालय/विद्यापीठात गुगल व्हिजिटची माहिती मिळवण्यासह गुगल व्हिजिटची मागणीही करू शकता. 
- टेक चॅलेंज : या आव्हानाच्या माध्यमातून गुगलतर्फे संगणक विज्ञान व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांत विद्यार्थी गुगलची संस्कृती, लॉजिकल थिंकिंग, सहकार्य करार, ऑन द स्पॉट कोडिंग आदी शिकू शकतात.

 

कोडिंग कॉम्पिटिशन्स 
कोडिंगची आवड असलेल्यांसाठीही विविध स्पर्धा घेण्यात येतात. यातील काही मुख्य स्पर्धांची नावे अशी आहेत-
- हॅश कोड : ही एक टीम प्रोग्रामिंग स्पर्धा असून, यात अभियांत्रिकीशी संंबंधित समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी स्वत:ची टीम व प्रोग्रामिंग लँग्वेजचे साह्य घेऊ शकता. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला २५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत नोंदणी करता येईल.
- कोड जॅम : या स्पर्धेत ‘कोड जॅम चॅम्प’चा किताब व १५ हजार डॉलर्स जिंकण्यासाठी गणितासंदर्भातील प्रश्न-कोड्यांच्या अनेक फेऱ्यांतून जावे लागेल व स्वकौशल्याची चाचणीही द्यावी लागेल. यात सहभागासाठी ५ मार्च २०१९ ही नोंदणीची शेवटची तारीख आहे. 
- किक स्टार्ट : विद्यार्थी व कोडिंग कॉम्पिटिशनमध्ये प्रथमच सहभागी होत असाल तर ‘किक स्टार्ट’ स्पर्धेत गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी कोडिंग स्किल्स वापरू शकता. याच्या एका फेरीतही भाग घेऊ शकता. सहभागासाठी १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत नोंदणी करता येईल.
 

बातम्या आणखी आहेत...