आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्ताच्या त्रासावर या उपायांनी मिळेल आराम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चुकीची जीवनशैली, सततची धावपळ, वेळी-अवेळी खाणे, फास्ट फूड, जागरण, मानसिक ताणतणाव आदी कारणांमुळे पित्तदोष बळावतात. शरीरात पित्त वाढले की, डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या, अस्वस्थता आदी लक्षणे दिसू लागतात. यावर आम्लता नष्ट करणारी अल्कलाइनयुक्त औषधे घेतल्याने तात्पुरता आराम मिळतो. परंतु, मूळ समस्या कायम राहते. यासाठी काही खास घरगुती उपाय जाणून घेऊयात.

  • हे उपाय करा

दूध : पित्तशामक थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील, छातीतील जळजळ कमी होते.

बडीशेप : बडीशेप खाल्ल्याने पित्ताची लक्षणे कमी होतात. पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेप पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यावे.

जिरे : जिरे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्यावे.

लवंग : लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यातून येणारा रस काही काळ तोंडात राहू द्यावा. या रसामुळे पित्ताची तीव्रता कमी होते.

वेलची : दोन वेलची सालीसह पाण्यात टाकून उकळा, हे पाणी थंड झाल्यावर प्यावे. पित्तापासून आराम मिळतो.

पुदिना : पुदिन्याची काही पाने कापून पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या.

आले : आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा. आले तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्यावे. किंवा आल्याचा तुकडा ठेचून गुळासोबत सेवन करावा.

आवळा : रोज चमचाभर आवळ्याची पावडर घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही.

बातम्या आणखी आहेत...