आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापैकी कोणतीही एक गोष्ट मिळाल्यास एका रात्रीतून बदलू शकते नशीब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्व धार्मिक ग्रंथ आणि प्राचीन पुस्तकांमध्ये अशा विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. येथे आपण चर्चा करत आहोत भारतीय धार्मिक ग्रंथामधून समोर आलेल्या अशा काही वस्तूंविषयी, ज्यांचे आजपर्यंत कोणतेही वास्तव समोर आलेले नाही. परंतु या वस्तूंचे अस्तित्व असल्यास कोणत्याही व्यक्तीचे भाग्य बदलू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच 7 वस्तूंची माहिती देत आहोत.


सोमरस
सोमरसचे वर्णन हिंदू धर्म ग्रंथांमध्ये आढळून येते. सोमरस एक असे पेय आहे. जे संजीवनीप्रमाणे काम करते. हे मद्य नसून दूध आणि औषधी वनस्पतीपासून तयार केलेले पेय आहे. हे पेय व्यक्तीला नेहमी तरुण ठेवण्यासोबतच क्रोध शांत करते आणि अमर बनवते. ऋग्वेदामध्ये याचे स्पष्ट वर्णन आढळून येते.


नागमणी
नागमणी संदर्भात सांगितले जाते की, ज्या व्यक्तीकडे नागमणी असतो त्याचे भाग्य बदलून जाते. नागमणीमध्ये अलौकिक शक्ती असते. या मण्याच्या तेजापुढे हिरासुद्धा निष्प्रभ ठरतो. परंतु आजपर्यंत अशाप्रकारचा कोणताही मणी आढळून आलेला नाही.


पारस मणी 
पारस मणीचा लोखंडाच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श झाल्यास ती वस्तू सोन्याची बनते. याचा वापर करून लोखंड कापले जाऊ शकते. असे मानले जाते की, कावळ्यांना याची पारख असते आणि हिमालयाच्या जवळपास हा मणी आढळून येतो. परंतु आजपर्यंत या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे याविशषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


अक्षय पात्र
धार्मिक मान्यतेनुसार हे चमत्कारिक अक्षय पात्र प्राचीन ऋषीमुनींकडे होते. महाभारतात वनवास काळात द्रौपदी या पात्राच्या मदतीने पांडवांना जेवण देत होती. अक्षयचा अर्थ ज्याचा कधीही क्षय किंवा नाश न होणे. 


कल्पवृक्ष
वेद आणि पुराणांमध्ये कल्पवृक्ष संदर्भात बरीच माहिती सांगण्यात आली आहे. कल्पवृक्ष स्वर्गातील एक झाड आहे. या झाडाखाली बसून व्यक्ती जी कोणताही इच्छा व्यक्त करतो ती पूर्ण होते. कारण या झाडामध्ये अपार सकारत्मक ऊर्जेचे भांडार आहे. हे झाड समुद्रमंथनातून निघाले होते.


संजीवनी
असे म्हणतात की, हिमालयात एक असे रोप आढळून येते, ज्याचा वापर करून मृत व्यक्तीलाही जिवंत केले जाऊ शकते. वाल्मिकी रामायणानुसार मूर्च्छित लक्ष्मणासाठी हनुमानाने संजीवनी आणली होती. या रोपाच्या मदतीनेच शुक्राचार्यांनी देवासूर युद्धात असुरांना जिवंत केले होते. आजही यावर विविध शोध चालू आहेत परंतु अद्याप कोणतेही परिणाम मिळाले नाहीत.


स्वर्ण जडीबुटी
सोन्याच्या निर्मितीमध्ये तैलीय कंद जडीबुटीचे मोठे योगदान मानले जाते. अशा काही आयुर्वेदिक औषधी आहेत ज्यामुळे व्यक्ती पुन्हा तरुण होऊ शकतो. औषधींच्या बळावर व्यक्ती 500 वर्षांपर्यंत निरोगी राहून जिवंत राहू शकतो. यापासून धन प्राप्त केले जाऊ शकते तसेच सर्व दुःख दूर होण्यास मदत होते.

बातम्या आणखी आहेत...