आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अति रागावर नियंत्रणासाठी हे सात उपाय करा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राग येणे खूप सामान्य समस्या आहे. एकाला राग आला की इतर लोकांना राग झेलावा लागतो. स्वत:च्या या सवयीचा कंटाळा आला असेल आणि सुचत नसेल की कशा प्रकारे कंट्रोल करावा तर जाणून घ्या काही सोपे उपाय ज्यामुळे आपले संबंधही बिघडणार नाहीत आणि वेळ सांभाळून घेता येईल. 


* राग येण्याचं मुख्य कारण आहे ताण. आता ताण दूर करण्यासाठी स्नायूंना रिलॅक्स करा. खोल श्वास घ्या आणि दोन मिनिटांसाठी अगदी गप्प बसा, काही सेकंदांतच आपण शांत व्हाल. 


* आपले डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या. आता विचार करा की ताण दूर होतोय. आपल्या विचारशक्तीने ताण आपोआप दूर होईल. 


* परफ्यूमदेखील एक पर्याय आहे, हे ऐकून हैराण व्हाल, पण सुगंधामुळे ताण दूर होतो. आपण ताज्या फुलांचा सुवास घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही सुगंधामुळे आपला ताण दूर होईल. 


* राग कमी करण्यासाठी गार पाणी प्यावं आणि उलट गणना करणे सुरू करावे. हा उपाय नक्कीच काम करेल. याव्यतिरिक्त सकारात्मक विचार मनात आणावेत आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. 


* कॉमेडी बघणे, वाचणे, ऐकणे याने काही मिनिटांतच आपला राग नाहीसा होईल. हास्य जीवनातील भाग असणे आवश्यक आहे. 


* पायी फिरणे, व्यायाम, योगा, किंवा कोणत्याही शारीरिक व्यायामामुळे ताणमुक्त होऊन राग दूर ठेवता येईल. पण हे नियमित असावे. 


* मेडिटेशन अर्थात ध्यान ताणमुक्त राहण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. हे टॉनिकप्रमाणे काम करतं आणि मन शांत ठेवण्यात मदत करतं. याने मानसिक क्षमतादेखील वाढते. 

बातम्या आणखी आहेत...