आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2020 मध्ये या स्मार्टफोन्सची असेल प्रतीक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमसंग गॅलक्सी एस11 - पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये येऊ शकतो. प्रश्न असा आहे की, तो सर्व ब्रँड्सवर काम करेल? कॅमेरा मॉड्यूल वाढण्याची अपेक्षा आहे कारण कॅमेरा जास्त शक्तिशाली असेल. डिस्प्लेवर पंच होल लहान होईल.

ओप्पो फाइंड एक्स 2 - २०१९ मध्ये लाँच होणार होता पण आता २०२० च्या सुरुवातीलाच येईल. स्नॅपड्रॅगन ८६५ त्यात मिळणे निश्चित आहे. ओप्पो त्यात डिस्प्ले कॅमेरा आणत आहे अशी अपेक्षा केली जात आहे. या वैशिष्ट्यांमुळे हे एक रोमांचक लाँच असेल.

नोकिया 8.25 जी - नोकियाचा हा 5 जी हँडसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 सिरीज हार्डवेअरवर आधारित असू शकतो. वेगवान कनेक्शन स्पीड मिळणे निश्चित आहे, पण अनेक फीचर्स अजून उघड नाहीत. नव्या वर्षातील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच लाँच होऊ शकतो.

शाओमी एमआय 10 - शाओमीने निश्चित केले आहे की, २०२० मध्ये एमआय 10 येईल. त्यात 108 मेगापिक्सल कॅमेरा मिळू शकतो. ज्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे अशा पहिल्या फोन्सपैकी हा एक आहे.

सॅमसंग फोल्ड - सॅमसंग गॅलक्सी फोल्ड सर्व ठिकाणी मिळतो. आता सॅमसंगकडून लहान फोल्डिंग फोनची अपेक्षा आहे. मोटो रेझरसारखा येण्याच्या काही गोष्टी सुरू आहेत. पण ठोस समोर आले नाही. असेही म्हटले जात आहे की, ६.७ इंचाचा डिस्प्ले या फोनमध्ये असेल जो फोल्ड झाल्यानंतर अर्धाच होईल.

बातम्या आणखी आहेत...