आरोग्य / चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी करा हे उपाय

मेटाबॉलिझमची प्रक्रिया मंदावली तर शरीरातील ऊर्जा पातळी आपोआप कमी होते

दिव्य मराठी

Feb 19,2020 12:20:00 AM IST

मेटाबॉलिझम (चयापचय) ही एक प्रक्रिया असून त्यात सेवन केलेल्या खाद्यपदार्थांचे आणि पेयांचे ऊर्जेत रूपांतर करते. जर मेटाबॉलिझमची प्रक्रिया मंदावली तर शरीरातील ऊर्जा पातळी आपोआप कमी होते. ही प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जाणून घेऊया...


- सकाळचा नाष्टा अवश्य करावा. न केल्यास मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावते.

- जास्त काळ उपाशी राहू नये. जर योग्य वेळी नाष्टा आणि जेवण केले तर वजनही संतुलित राहते.

- झोपण्याच्या दोन तास आधी अवश्य जेवण करावे.

- 1200 पेक्षा कमी कॅलरी घेतल्यावर मेटाबॉलिझम कमी होतो.

- ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.

- कार्बोदके (कारबोहायड्रेट्स) घ्यावी आणि मेदयुक्त पदार्थ कमी करावे.

- दररोज व्यायाम करावा. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे चालावे.

- वजन उचलण्याचा व्यायाम करून स्नायू पिळदार करावेत.

- शारीरिक हालचाली वाढवाव्यात.

- दारूचे सेवन करू नये आणि भरपूर पाणी प्यावे.

X