आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंचीने कमी असलेल्या या प्रतिभावंत कलावंतांनीही मिळवली लोकप्रियता, जाणून त्यांच्याविषयी काही खास गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : लोकप्रियतेचा अंगकाठीशी नव्हे तर प्रतिभेशी संबंध असतो. प्रतिभा कोणत्याही माणसांमध्ये असू शकते. याचा प्रत्यय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील काही ठेंगण्या कलाकारांना पाहून येतो. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने लोकप्रियता मिळवली आहे, लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या कामाबद्दल ते खूप गंभीर आहेत आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. जाणून घेऊया या कलाकारांविषयी...

श्रीधर वत्सर... 

श्रीधर वत्सर 'बलवीर' आणि आता 'बलवीर रिटर्न्स' या कल्पनारम्य मालिकेत अभिनय करण्यासाठी ओळखला जातो. श्रीधरने आपल्या आश्चर्यकारक कॉमिक टायमिंगद्वारे लोकांचे मनोरंजन केले. हृतिक रोशन आणि ईशान खट्टर यासारख्या दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले आहे. बलवीर रिटर्न्समध्ये, तोबा-तौबा आणि दुबा-दुबा या पात्रांद्वारे तो जगभरात पोहोचला आहे. याआधी त्याने सब टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' साठी देखील काम केले आहे.

लिलिपुट... 

लिलिपुटला कोणत्याही परिचयाची गरज नाही. एम. एम. फारुकी, लिलिपुट, हे नाव भारतातील घराघरात प्रसिद्ध आहे, ते मनोरंजन जगतात आपल्या योगदानासाठी ओळखले जातात. चित्रपट जगतात त्यांचा प्रवास खूप प्रभावशाली ठरला, त्यांनी दूरदर्शन व नाट्यगृहात नावलौकिक मिळवला. प्रतिक्रिया लिलिपुट यांच्या अभिनयातून त्यांचा आत्मविश्वास झळकतो. लिलिपट सध्या 'विद्या' या शोमध्ये दिसत आहे.

केके गोस्वामी... 

केके गोस्वामी काल्पनिक मालिका 'शक्तिमान' मधून घराघरात पोहोचला. ९०च्या दशकात प्रत्येक मुलगा केके गोस्वामीचा फॅन होता.


त्याने लाखो लोकांचे मने जिंकली. गोस्वामी टेलीव्हिजन इंडस्ट्रीचे प्रसिद्ध नाव आहे. त्याने 'श्श्श...कोई है', 'विकराल और गबराल', 'सी.आई. डी.', 'गुटर गूं'मध्ये काम केले आहे. केके नुकताच 'भाबीजी घर पर हैं' मालिकेत दिसला होता.

जुही असलम... 

जूही आपली पहिली मालिका 'बाबा ऐसो वर ढूंढो' मधूनच स्टार झाली होती. मनाेरंजन जगतात ितचा प्रवास सहज झाल्याचे ती सांगते. तिच्या अभिनयाने अनेक लोकांची मने जिंकली. ती भारतीय टेलीविजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने चांगल्या मालिकेत काम केले आहे. यात 'जोधा अकबर', 'द सीरियल' आणि 'वॉरियर हाई'चा समावेश आहे.