ग्रंथ ज्ञान / सुखी वैवाहिक जीवनासाठी लक्षात ठेवा श्रीमद् भगवत गीतेतील या गोष्टी, यामुळे बिघडणार नाही गृहस्थी

या गोष्टींपैकी एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले तर संसार बिघडायला वेळ लागत नाही
 

दिव्य मराठी वेब

Jun 10,2019 02:30:00 PM IST

जीवन मंत्र डेस्क - पती-पत्नीत होणारी छोटी-मोठी भांडणं ही साधारण गोष्ट आहे. नाते टवटवीत ठेवण्यासाठी ते आवश्यक देखील आहेत. पण कधी-कधी या लहान भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होते आणि गृहस्थी बिघडते.


1. एकमेकांप्रती सम्मान

2. एकमेकांवरील विश्वास

3. एकमेकांप्रती निष्ठा

वरील तिन्ही गोष्टींपैकी एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले तर संसार बिघडायला वेळ लागत नाही. या गोष्टीला श्रीमद् भगवतगीतेत दिलेल्या राजा यायतिच्या कथेवरून समजू शकता.

अशी आहे ययातिची कथा

राजा ययाति पराक्रमी राजा होता. त्यांच्या विवाह दैत्य गुरू शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी हिच्यासोबत झाला होता. विवाहाआधी शुक्राचार्यांनी ययातिकडून वचन घेतले की, ते कधीच देवयानी शिवाय परस्त्रीशी संबंध ठेवणार नाहीत. कालांतराने देवयानी गर्भवती झाली. पण यामुळे शर्मिष्ठाला तिच्याबद्दल ईर्ष्या होऊ लागली. शर्मिष्ठा, राजा ययातिच्या महालाच्या पाठीमागील झोपडीत राहत होती. तिने ययातिला आपल्या जाळ्यात अडकवले होते. एकेदिवशी देवयानीला ही गोष्ट माहीत झाली. यावर शुक्राचार्यांनी ययातिच्या भ्रष्ट आचरणाविषयी ऐकून ययातिला श्राप दिला की तो तरुण अवस्थेतच वृद्ध होईल. ययातिने आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली पण राजाच्या वैवाहिक जीवनाचे सुख, विश्वास आणि सन्मान सर्वकाही धुळीस मिळाले होते. यामुळे वरील तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे.

X
COMMENT