आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात जास्त बुद्धिमान असतात या दोन राशीचे जातक, वाचा इतरही खास गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये एकूण 9 ग्रह आणि 12 राशी सांगण्यात आल्या आहेत. या सर्व 12 राशींचे वेगवेगळे ग्रह स्वामी आहेत. तिसरी आणि सहावी राशी म्हणजे मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रह बुद्धीशी संबंधित आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह शुभ स्थितीमध्ये असतो, ते बुद्धिमान असतात आणि बुद्धीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त करतात. याना मूर्ख बनवणे सोपे नाही. बुध ग्रहाची या दोन्ही राशींवर विशेष कृपा राहते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दोन्ही राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...

 

मिथुन
नामाक्षर : का, की, कू, घ, ड, छ, के, को, ह
राशीचे स्वरूप - स्त्री-पुरुष आलिंगनबद्ध
राशी स्वामी - बुध
1. राशिचक्रातील ही तिसरी रास. राशीचे चिन्ह तरुण युगुल आहे. ही द्विस्वभावाची रास आहे.
2. या लोकांमध्ये दूरदृष्टी, बहुमुखी प्रतिभा आणि चातुर्याने कार्य करण्याची क्षमता असते. हे लोक पत्रकार, लेखक, विविध भाषांचे ज्ञान असणारे आणि योजनाकार असतात.
3. आखलेल्या रेषेत राहून काम करतात आणि आयुष्यभर लाभ प्राप्त करतात. व्यक्ती सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहतो.
4. या लोकांना बुद्धीला चालना देणाऱ्या कामामध्ये यश मिळते.
5. या राशीच्या व्यक्तींना वाहनांची चांगली माहिती असते. नवनवीन वाहने आणि भौतिक साधानांचे खूप आकर्षण असते. घरगुती सजावटीवर अधिक भर असतो.


कन्या
नामाक्षर :
टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
राशीचे स्वरूप - कन्या
राशी स्वामी - बुध
1. राशिचक्राची सहावी कन्या राशी. या राशीचे चिन्ह हातात फूल घेऊन कन्या असे आहे. बुध राशीचा स्वामी आहे.
2. या राशीच्या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षी आणि भावुकही असतात. यांची कोणत्याही व्यक्तीसोबत सहज मैत्री होऊ शकते.
3. बुध ग्रहाचा प्रभाव यांच्या जीवनावर स्पष्ट दिसून येतो. चांगले गुण, विचारपूर्ण जीवन, बुद्धिमत्ता या राशीच्या लोकांमध्ये पाहण्यास मिळते.
4. हे आपल्या योग्यतेच्या बळावर उच्चपदापर्यंत पोहचतात. प्रतिकूल परिस्थितीसुद्धा यांना घाबरवू शकत नाही आणि हे चातुर्याने पुढे जात राहतात.
5. शिक्षण आणि आयुष्यात यश प्राप्त झाल्यामुळे यांच्या स्वभावातील चांगुलपणा कमी होत नाही कारण नम्रता यांचा स्वाभाविक गुण आहे.

बातम्या आणखी आहेत...