आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • They Quit Their Overseas Jobs With Reputed Companies, Now Teaches Children In The Village, Helps Farmers.

नामांकित कंपन्यांसह विदेशातील नोकऱ्या त्यांनी सोडल्या, आता गावात मुलांना शिकवतात, करतात शेतकऱ्यांना मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : बड्या नोकऱ्या सोडून समाजात ज्यांना मदतीची गरज आहे अशांना मदत करण्याच्या कामी काही युवकांनी पुढाकार घेतला आहे. आयआयटीचे साहिल अग्रवाल आणि कुमार शुभम यांनी २०१४ मध्ये व्हिजन इंडिया फाउंडेशन स्थापन केले. यात कायदा, आर्थिक धोरण, पर्यावरण यांसारख्या विषयांवर एक प्रशिक्षण मॉडेल तयार केले. या कामी त्यांना दिल्ली आयआयटीचे प्रो. नामेश बोलिया व आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी शोभित माथूर यांचे मार्गदर्शन लाभले.

नमन बन्सल : सोलार प्रोजेक्टरचे शिक्षण, ६०% मुले मुख्य प्रवाहात

मेरठचे सॉफ्टवेअर इंजिनिअर नमन बन्सल (२७) यांनी दोन वर्षांपूर्वी विप्रोतील नोकरी सोडली. आज ते अजमेरच्या बेयरफूट कॉलेजच्या माध्यमातून गावात सोलार प्रोजेक्टरच्या माध्यमातून रात्रशाळा चालवतात. १० राज्यांत ४७ शाळांतून ही मोहीम सुरू आहे. नमनच्या टीमने आतापर्यंत दीड लाख मुलांना शिक्षण दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही नमनला या कार्याबद्दल गौरवले.

अमन गुप्ता : शेतकऱ्यांकडून नारळाचे पाणी खरेदी, उत्पन्न ३०% वाढवले

नोएडाचा अमन गुप्ता (२९) यांनी आयआयटी दिल्लीतून बीटेक केल्यावर ऑपेरामध्ये नोकरी केली. चार वर्षांपूर्वी त्यांनी मासिक २ लाखांची नोकरी सोडली. आयुर्वेदातील संधी पाहून ऑरेक स्टार्टअप उभारले. आज तामिळनाडूत ते ५ हजार शेतकऱ्यांकडून थेट नारळ पाणी, फळे खरेदी करतात. ऑनलाइन स्टोअरच्या माध्यमातून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. यामुळे दलाली कमी झाली.

रोहित परख : जैविक बियाच्या क्षेत्रात कार्य, ४ हजार शाळांत किचन गार्डन

परख (२८) यांनी तीन वर्षांपूर्वी लंडन येथील बँकेची मासिक ३ लाखाची नोकरी सोडली. ते सध्या सहायक ट्रस्टसोबत काम करतात. शेतकऱ्यांकडून जैविक बियाणे ही संस्था खरेदी करते आणि सामान्य लोकांना स्वस्त दरात किचन गार्डनसाठी उपलब्ध करून देते. महाराष्ट्रात १० जिल्ह्यांत त्यांनी सरकारी शाळांत किचन गार्डन सुरू केले आहे. यासाठी ते ठिकठिकाणी कार्यशाळाही घेतात.