Home | National | Other State | thief in Mobile store caught in CCTV in Kota, Rajasthan,

20 मिनीटात 10 लाखांची चोरी, दिवाळीसाठी मागवलेले मोबाइल चोराने केले लंपास

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 03:53 PM IST

सीसीटीव्ही मध्ये कैद झाला चोर. तब्बल 80 मोबाइल भरले बॅगमध्ये

  • व्हिडीओ डेस्क : राजस्थानच्या कोटा येथे दीपावलीच्या प्रसंगी चोरांनी एका मोबाइल शॉपला लक्ष्य केले. अक्षय कॉलनीमधील गोविंद मोबाईल पॉईंट दुकानाचे शटर तोडून चोरांनी हात साफ केला आहे. चोरीची संपूर्ण घटना शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. एक चोर मोबाईलचे बॉक्स बॅगमध्ये भरताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. चोरांनी सुमारे 10 लाख रूपये किमतीचे 80 मोबाइल लंपास केले आहे. दुकानदाराने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मोबाइल्स मागविले होते. ज्यावर चोरट्यांनी हात साफ केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

  • thief in Mobile store caught in CCTV in Kota, Rajasthan,
  • thief in Mobile store caught in CCTV in Kota, Rajasthan,

Trending