आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टधातुची मूर्ती चोरणाऱ्याने स्वतः मंदिराच्या स्वाधीन केली मूर्ती; म्हणाला - प्रभू रामचंद्र रात्री झोपू देत नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - वास्तविक जीवनात असे अनेकदा घडते की, हरवलेली एखादी वस्तू आपल्याला परत मिळते, पण अयोध्येत एक अजबच घटना घडली. येथील एका चोरट्याने चोरलेली श्रीरामांची मूर्ती देवळात परत आणली. तर झाले असे की, येथील नजरबाग भागात असलेल्या माधुरी कुंजमधून 140 वर्ष जूनी अष्टधातुची भगवान श्रीरामांची मूर्ती मागील सोमवारी चोरी झाली होती. त्यामुळे परिसरात एकज खळबळ उडाली. पण चोरी झाल्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी अचानक चोर मुर्ती घेऊन मंदिरात आला आणि पुजाऱ्यांकडे देऊन म्हणाला, जेव्हापासून मी मूर्तीची चोरी केली आहे, तेव्हापासून मला झोप लागत नाही आणि संपूर्ण शरीर थंड पडले आहे.


पुजाऱ्याने पोलिसांना संबंधीत घटनेची माहिती दिल्यानंतर चोर आणि मूर्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी दुपारी मंदिराचे कुलूप तोडून 9 इंचाची अष्टधातूपासून बनवलेली श्रीरामांची मुर्ती चोरी झाली होती. या सर्व प्रकारनंतर परिसरातील नागरिकांनी चमत्काराची भावना व्यक्त केली आहे. तसेच, पुजारी राजबहादुर शरण यांनी हा देवाचा साक्षात्कार असल्याचे म्हटले.

बातम्या आणखी आहेत...