आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल बँकेच्या एटीएमवर चोरट्यांचा डल्ला, दहा लाखांवर रक्कम केली लंपास;

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पातूर : पातूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कापशी (रोड)येथील सेंट्रल बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरांनी अंदाजे १० लाख लंपास केल्याची घटना १८ जानेवारीला पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. एटीएम फोडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. 


प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ४ वाजता दरम्यान, कापशी रोड येथील एटीएमच्या वरच्या मजल्यावर राहणारे राजू भाकरे यांना शटरचा आवाज आल्याने, त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांना सेंट्रल बँकेचे एटीएम कोणीतरी उघडत असल्याची चाहूल लागली. त्यांनी आरडाओरड केला. परंतु एव्हाना चोर पळून गेले होते. चोरटे कुठल्या दिशेने पळाले, हे कळू शकले नाही, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी पातूरचे ठाणेदार, बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, अकोला येथील श्वानपथक, ठसे तज्ज्ञ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख घटनास्थळी पोहोचले. चोरी करतेवेळी चोरट्यांनी बोलेरो महिंद्रा कंपनीची कार वापरल्याचे समजते. पोलिस स्टेशनच्या हद्दीत कापशी रोड येथे कापशी ते माझोड रोडवर, वासुदेव धुमाळे यांची जागा सेंट्रल बँक ऑफ इंडियाला भाडेतत्त्वावर दिली आहे. येथेच बँकेसह एटीएम मशीन आहे. कापशी (रोड)एटीएमसह लोहारा,पिंजर,तेल्हारा,उकळी बाजार, माळेगाव बाजार मुंडगाव, हिवरखेड येथील सेंट्रल बँकेच्या एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई येथील सीएसएस या कंपनीकडे दिली आहे. या ठिकाणच्या एटीमच्या सुरक्षा गार्डवर देखरेखीची जबाबदारी जुने शहर अकोला येथील विशाल तेलंग नामक व्यक्तीकडे असून, कापशी(रोड) येथे सुरक्षा रक्षक नसल्याची कबुली विशाल तेलंग यांनीच दिल्याने, या एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर आहे. परंतु या निमित्ताने पोलिसांनी रात्र गस्त करते वेळी, या एटीएम मशीनवर सुरक्षा रक्षक आहे किंवा नाही याची नोंद घेतली का नाही, हा प्रश्न आहे या घटनेची तक्रार सेंट्रल बँकेचे प्रबंधक राहुल प्रतीपे यांनी पोलिस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. एक वर्षापासून घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनेचा तपास पोलिसांना लावण्यात यश आले नसल्याने या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान नांदखेड फाटा व माळराजुरा येथे लूटमारीची घटना घडली होत्या त्यातील आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली होती. 

 

एटीएमच्या सुरक्षेसाठी चौकीदार नियुक्त नाही 
कापशी येथील बँकेच्या एटीएम मशीनवर अनेक दिवसांपासून चौकीदार नसून, बँक प्रशासनाने वरिष्ठ अधिकारी याची माहिती दिली आहे की नाही कापशी सारख्या लहान गावात,एवढी मोठी रक्कम टाकली याची माहिती चोरट्यांना होती काय ,या बँकेच्या चौकीदारांवर देखभाल ठेवण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? पातूर पोलिस रा़त्रीच्या वेळी गस्तीवर असताना, या ठिकाणी चौकीदार आहे किंवा नाही याची स्टेशन डायरीत नोंद घेऊन याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बँकेला याबाबत माहिती दिली होती का?असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत 
 
 

'त्या' घटनांमधील चोरट्यांचा पोलिसांना अद्यापही लागला नाही सुगावा 
पातूर शहरात गेल्या काही काळात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे त्या मध्ये पातूर पोलिस स्टेशन च्या काही अंतरावरील एका प्रिंटिंग प्रेस मध्ये अज्ञात चोरट्याने हात साफ केला होता तर पातूर बाळापूर रोडवरील दोन ज्वेलर्स मध्ये सुद्धा अज्ञात चोरट्याने तब्बल आठ ते दहा टाळे तोडून दोन दुकानातील चांदीचे व सोन्याचे दागिने लंपास केले होते या चोरट्यांचा शोध अद्यापही लागलेला नसून त्या चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे 

बातम्या आणखी आहेत...