आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांनी मूर्तीवरील दागिन्यांसह दानपेटी केली लंपास, चोरी CCTVमध्ये झाली कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : घटना आहे नवी मुंबई येथील वाशी परिसरातील एका जैन मंदिरामधील चोरीची . ही  घटना    कैद झालेली आहे सीसीटीव्ही कॅमेरात. आपण पाहू शकता कश्या प्रकारे  दोन चोरट्यांनी मंदिराची दानपेटी, भगवान महावीरांच्या मूर्तीवर असणारे दागिने लंपास केले.  फुटेज नुसार लवकरात लवकर आरोपींवर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली .

 

ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता की, कसे दोन चोर लोखांडी रॉड ने मूर्तीवरील दागिने काढत आहेत. मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार एक दानपेटी, मूर्तीवरील काही रत्न, चांदीचे शिक्के आणि मूर्तीवरील ६५ हजारांची दागदागिने चोरट्यांनी पळवली.

 

सीसीटीव्ही फुटेज नुसार त्यांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.     

 

बातम्या आणखी आहेत...