आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराबाहेर एकटी उभी होती सुंदर तरुणी, बंदूक दाखवून गुंड मागू लागला तिचा मोबाईल, पण ही चूक पडली भलतीच महागात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियो दि जेनेरियो - ब्राझीलमध्ये एका सुंदर तरुणी एकटी असल्याचे पाहून तिचा मोबाईल लुटण्याचा प्रयत्न एका चोराला भलताच महागात पडला. तरुणीने त्याची चांगलीच धुलाई केली आणि त्याला असा धडा शिकवला की, तिला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने ज्या तरुणीशी पंगा घेतला होता तो साधीसुधी तरुणी नव्हती तर अमेरिकन मार्शल आर्टमध्ये एक्सपर्ट होती. तसेच ती UFC ची प्रसिद्ध फायटरही होती. त्यानंतर चोर तिची माफी मागत सोडण्यासाठी विनवण्या करू लागला. 


एकापाठोपाठ लगावले ठोसे.. 
- ब्राझीलच्या रियो दि जेनेरियो शहरातील हा प्रकार आहे. येथील फेमस UFC फायटर पोलियाना व्हिएना (26) घराबाहेर उभी राहून कॅबची वाट पाहत होती. त्यावेळी एक व्यक्ती तिथे आला आणि बंदूक दाखवून तिचा मोबाईल मागू लागला. त्यानंतर संधी साधून तरुणीने त्याला एकापाठोपाठ ठोसे लगावण्यास सुरुवात केली. 
- न्यूज एजन्सीशी बोलताना पोलियानाने सांगितले की, 'जेव्हा ती बाहेर कॅबची वाट पाहत होती तेव्हा एक व्यक्ती माझ्याजवळ येऊन बसला आणि वेळ विचारू लागला. मी मोबाईल काढताच तो हळू आवाजात म्हणाला, मोबाईल मला दे आणि हलण्याचा प्रयत्न करू नको कारण माझ्याकडे बंदूक आहे.

 
असा आला संशय.. 
- पोलियाना म्हणाली, एवढे बोलून त्याने बंदूक माझ्या पाठीला लावली. पण मला ती काहीतरी नरम वस्तू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ती बंदूक नसल्याची खात्री मला पटली. तो माझ्या अगदी जवळ होता. मला लक्षात आले की, बंदूक असती तर तो एवढा जवळ आला नसता. लगेचच मी उठले आणि त्याच्यावर एकापाठोपाठ ठोशे आणि लाथा मारण्यास सुरुवात केली. 
- त्या चोराची अवस्था एवढी खराब झाली की, रक्त वाहू लागले, त्यामुळे उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...