आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडेजाव करण्यासाठी चोरीच्या मार्गाला लागली महिला, विवाहित असूनही राहत होती लिव्ह इनमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मोठ्या भावाच्या लग्नात बडेजाव करण्यासाठी कार घेऊन जाण्याच्या स्वप्नापाई एक महिला चक्क चोर बनली. आरोपी महिलेने लिव्ह-इन पार्टनर आणि एका मित्रासह कार चोरीचा कट रचला, पण पोलिसांच्या जाळ्यात आडकले. आरोपींनी देहरादूनहून एक कार भाड्याने घेतली. दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये त्यांनी ड्रायव्हरला बंदुकीचा धाक दाखवत कार चोरी केली. पण कारमध्ये जीपीएस होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ट्रेस करत ख्याला परिसरात अटक केली. ते सर्व कार घेऊन झारखंडला फरार होण्याच्या प्रयत्नात होते. आरोपी वंश वर्मा (26) आणि गझला उर्फ सपना (26) कडून चोरीची पल्सर बाईक, एक पिस्तुल आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 


विवाहित असूनही लिव्ह इनमध्ये राहते.. 
पोलिसांनी सांगितले की, गझलाचे 2009 मध्ये लग्न झाले होते. पण पतीशी वादानंतर ती वेगळी राहू लागली. वंश देहरादूनमध्ये टॅक्सी चालवत होता. त्याठिकाणी दोघांची ओळख झाली. वंश आधीच विवाहित आहे. तो पत्नीला सोडून गझलाबरोबर देहरादूनमध्ये राहू लागला. गझलाला एक मुलगाही आहे. तो नातेवाईकांबरोबर झारखंडमध्ये राहतो. या महिन्यात गझलाच्या मोठ्या भावाचे लग्न आहे. 


टॅक्सी ड्रायव्हरला चालत्या कारमधून फेकले. 
लिव्ह-इन पार्टनरच्या मदतीने गझलाने आधी रघुबीर नगरच्या राहणाऱ्या शाबीरने पिस्तुल मिळवले. 3 ऑक्टोबरच्या रात्री गझला, शाबीर आणि वंशने दिल्लीच्या पालममध्ये श्राद्धाच्या कार्यक्रमात जाण्यासाठी म्हणून एका ट्रॅव्हल एजन्सीकडून कार हायर केली. 


बाइकवर फिरताना पकडले 
7 ऑक्टोबरला पोलिसांना मिळालेल्या टिपच्या आधारे चोरीच्या बाईकवर फिरणाऱ्या गझला आणि वंशला पकडले. दुसऱ्या दिवशी ते झारखंडला निघणार होते. पोलिस घटनेत सहभागी होणाऱ्या शाबीर आणि काजलच्या शोधात आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...