आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेराने देवाला पत्रात लिहिले, माझा गुन्हा माफ कर, नंतर दानपेटीतून चोरली रक्कम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदिरात सापडलेले पत्र - Divya Marathi
मंदिरात सापडलेले पत्र

सारनी - मध्य प्रदेशातील सारनी शहराच्या राधाकृष्णन वॉर्ड क्रमांक २ मधील सिद्धेश्वर हनुमान मंदिरात एका चोरट्याने दानपेटी फोडून सोमवारी  त्यातील हजारोंची रक्कम लांबवली. या चाेरट्याने देवाला एक पत्र लिहिले, माझे सगळे गुन्हे माफ कर. मंगळवारी सकाळी मंदिरात आलेल्या भाविकांना दानपेटी उघडीच दिसली.  हे मंदिर सार्वजनिक आहे. परंतु पुजाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. चोरीच्या घटनेने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. मंदिराची व्यवस्था पाहणारे लखनलाल मालवीय,अमरलाल बागवे, राहुल कापसे,देवीलाल धुर्वेसह अन्य सदस्यांनी सांगितले, मंदिराची दानपेटी गेल्या तीन वर्षापासून उघडण्यात आलेली नव्हती. या दानपेटीत सुमारे ४० ते ५० हजार रुपये असावेत. सदस्यांनी सांगितले, या आधीही मंदिरात काही समाजकंटकांनी हनुमानाची  मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. 
 

पत्रात लिहिले... सर्व काही चांगले झाले तर ५०० रु. देईन
परमेश्वरा, मी आजवर ज्या चुका केल्या  त्याबद्दल तू मला माफ केले आहे. आजपासून मी सर्वकाही सोडून देईन. तुला धर्मासाठी माझ्या मात्यापित्यांसाठी माझे ऐकावेच लागेल. माझे सगळे काही भले झाले तर मला तू ही शेवटची संधी दिली आहेस असे समजेन. देवा माझे भले झाले तर मी काेणत्याही इतर देवस्थानात जाऊन तुला ५०० रुपये दान करेल.