आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनसाखळी चोरास एमआयडीसी पोलिसांकडून दीड वर्षानंतर अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या गळ्यातील ८५ हजार रुपयांची सोनसाखळी लांबवल्याच्या गुन्ह्यात बेपत्ता असलेल्या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी तब्बल दीड वर्षानंतर अटक केली. या चोरट्यावर ठाण्याच्या सत्र न्यायालयाने मकोका कायद्यानुसार कारवाई केली आहे. 

 

सय्यद उर्फ सरफराज फिरोज जाफरी उर्फ सरफराज, फिरोज बेग उर्फ सय्यद, उर्फ इराणी, उर्फ सरफराज फिरोज इराणी (वय २८, रा.आंबावली, ता.कल्याण, जि.ठाणे व अजमेरनगर, राजस्थान) असे चोरट्याचे नाव आहे. सरफराज याने कासीम शहा गरीब शहा इराणी (वय २९, रा.श्रीरामपूर, जि.नगर) यांच्या मदतीने ९ एप्रिल २०१७ रोजी शहरातील वर्षा कॉलनीत मोकळ्या जागेवर फिरत असलेल्या नलिनी प्रल्हाद भोळे (वय ७२) यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. भोळे यांचे लक्ष विचतील होताच सरफराजने त्यांच्या गळ्यातील ८५ हजार रुपयांची सोनसाखळी तोडून पोबारा केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

 

गुन्हा घडल्यानंतर दोघे चोरटे पसार झाले होते. यानंतर कासीम शहा याला अटक केली होती. तर सरफराज पळून गेला होता. दरम्यानच्या काळात सरफराज याने पुणे, मुंबईत अशाच प्रकारचे गुन्हे केले होते. ठाणे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यामुळे त्याच्यावर मकोका कायद्यानुसार कारवाई केली होती. यानंतर तो आंबिवली येथे लपून गुन्हे करीत होता. ही माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक अानंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत व विजय नेरकर यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी त्याला आंबिवली येथून ताब्यात घेतले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ५ दिवस पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. गिरीश बारगजे यांनी काम पाहिले. 


रिकव्हरी झालीच नाही 
सरफराज व कासीम या दोघांनी मिळून भोळे यांची सोनसाखळी लांबवली होती. कासीम याला अटक केल्यानंतर सोनसाखळी सरफराजकडे असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली होती. त्यामुळे सरफराजला अटक करणे गरजेचे होते. आता रिकव्हरी करण्यासाठी सरफराज याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. 

 

दुचाकीही चोरीचीच 
कासीम व सरफराज यांनी वापरलेली दुचाकीदेखील चोरीची होती. तिची पासिंगच झाली नसल्याचे तपासात समोर आले आहे. ही दुचाकी कोठून आणली? तसेच दुचाकीदेखील जप्त करायची असल्यामुळे सरफराज याची कोठडी घेतली. 
 

बातम्या आणखी आहेत...