आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील औंधमध्ये ज्वेलर्स दुकानावर चोरट्यांचा डल्ला; अंदाजे चाळीस किलो चांदी व सोन्याचे दागिने लंपास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - औंध परिसरातील कुमार क्लासिक सोसायटीमधील नाकोडा ज्वेलर्सवर गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकला. या वेळी दोन लाखाची रोकड, अंदाजे चाळीस किलो चांदी व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला आहे.

कटावणीच्या साह्याने दुकानाचे मुख्य शटर तोडून चोरट्यांनी दुकानामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मेन लॉक तोडून सोने चोरी केले आहे. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये तोंडाला  रुमाल बांधलेले बांधलेले चार चोरटे दिसत आहेत. याप्रकरणी दुकान मालकाने चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा  दाखल करण्याचे काम सुरू आहे. दुकानाचे मालक भवानी पेठ राहण्यास आहेत पहाटे  पाचच्या दरम्यान दूध टाकण्यासाठी एक व्यक्ती सोसायटीत आली होती त्यावेळी त्याच्या निदर्शनास  हा सर्व प्रकार आला.  त्यानंतर त्याने त्याची माहिती फोनद्वारे मालकाला दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...