Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Thieves escaped with the money of the soldier

बहिणीच्या लग्नासाठी पैसे लागत असल्याचे कारण देऊन नकली साेन्याचा हार गहाण; सैनिकाला चार लाखाचा गंडा

प्रतिनिधी | Update - Dec 17, 2018, 10:58 AM IST

'आम्हाला हे साेने सापडले आहे. त्याचा ७९० ग्रॅमचा हार केला आहे. हा हार घ्या'- चोर

  • Thieves escaped with the money of the soldier

    नाशिक- गहाण घर सोडवण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत चक्क ७९० ग्रॅम सोन्याचा नकली हार गहाण ठेवत लष्करातील जवानाला चार लाखांना गंडा घातल्याचा प्रकार देवळाली कॅम्प मध्ये उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेसह युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेली माहिती आणि लष्करी जवान संतोषकुमार यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबरमध्ये संशयित विजय दशरथ चौधरी आणि एक महिला देवळाली येथील रेणुका देवी मंदिर येथे भेटले. गहाण ठेवलेले घर सोडवण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांबद्दल सहानुभूती वाटल्याने यादव यांनी शक्य होईल तेवढी मदत करण्याचे अश्वासन त्यांना दिले. मात्र दाेघा संशयितांनी जवानाला सोन्याचा खरा तुकडा दिला. 'आम्हाला हे साेने सापडले आहे. त्याचा ७९० ग्रॅमचा हार केला आहे. हा हार घ्या' असे सांगत खऱ्या सोन्याचा तुकडा दिला. जवान यादव यांनी सराफाकडे सोने खरे असल्याची खात्री केली असता सराफाने त्याची किंमत दहा लाख रुपये सांगितली. यादव यांनी सात लाख रुपयात सौदा केला. व्यवहाराचे ४ लाख रुपये दिले. उर्वरीत तीन लाख रुपये नंतर देण्याचे ठरले हाेेते. मात्र दोघा संशयितांनी रक्कम हाती लागताच खऱ्या सोन्याचा तुकडा घेत पोबारा केला. यादव यांनी हाराची खात्री केली असता ताे हार नकली असल्याचे समजले. यानंतर यादव यांनी पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. संशयितांच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला असता तो बंद आढळला. तसेच नावदेखील बोगस असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार तपास करत आहे.

    हार घेण्यासाठी घेतले उसनवार पैसे
    जवान यादव यांनी ७९० ग्रॅमचा हार कमी किंमतीत मिळत असल्याने मित्रांकडून पैसे उसने घेतले हाते. बँकेत जमा असलेली रक्कम काढून संशयितांना दिली. सुदैवाने तीन लाख रुपये देण्यापूर्वीच यादव यांना संशय आल्याने पुढील फसवणूक टळली.

Trending