आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केज- बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या करत जीपमध्ये आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला केज पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून साळेगाव ( ता.केज ) येथे रविवारी पहाटे पकडले. त्यांच्याकडून हत्यारे, १६ मोबाइल, २७ हजार ८९० रुपये जप्त करून चौघांना मुद्देमालासह नेकनूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
अंबड येथून दरोडेखोरांनी शनिवारी रात्री बोलेरो कंपनीची जीप (एम.एच. २० बी. एन.४८६) चोरून जीपमध्ये तीन चाकू, मोठे कटार, सलगर यासह दरोडा टाकण्याचे साहित्य बीड जिल्ह्याकडे आले. त्यांनी माजलगाव, गढी येथे मोबाइलची दुकाने फोडून नगदी रक्कम आणि १६ मोबाइल घेऊन दरोडेखोर मांजरसुंबा मार्गे नेकनूरकडे आले. रविवारी पहाटे काही महिला मॉर्निंग वॉकला रस्त्याने जात असताना या दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र ओरबाडून घेत केजकडे पळ काढला. महिलांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. नेकनूर पोलिसांनी केज पोलिसांना दरोडेखोर जीपमध्ये आल्याची माहिती देताच पोलिसांनी शहरातील शिवाजी चौकात नाकाबंदी केली. दरोडेखोरांनी बॅरेजेस चुकवून कळंब रस्त्याने जीप काढली. केजचे सहायक पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दरोडेखोरांचा सिनेस्टाइल पाठलाग केला.
जीप सोडून दुचाकीवरून पळ :
पोलिसांनी पुन्हा केजकडे येणाऱ्या दुचाकीच्या क्रमांकावरून दरोडेखोरांना पकडले. जीप चालक संतोष ओंकार गायकवाड (रा. तलवाडा, ता. गेवराई ), अक्षय भानुदास जाधव ( औरंगाबाद ), दीपक बबन गायकवाड ( रा. लवूळ, ता. माजलगाव ) बबन मोतीराम गायकवाड (रा. लवूळ, ता. माजलगाव ) या चौघांना ताब्यात घेतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.