आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

72 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील साेनसाखळी चाेरट्यास 8 महिन्यांनी ओळखले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नलिनी प्रल्हाद भोळे या ७२ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ८५ हजार रुपयांची सोनसाखळी चाेरीच्या गुन्ह्यात बेपत्ता असलेल्या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. 

 

सय्यद उर्फ सर्फराज फिरोज जाफरी, फिरोज बेग उर्फ सय्यद उर्फ इराणी उर्फ सरफराज फिरोज इराणी (वय २८, रा.आंबावली, ता. कल्याण, जि. ठाणे व अजमेरनगर, राजस्थान) असे चोरट्याचे नाव आहे. दरम्यान, नलिनी भोळे यांनी शनिवारी या चोरट्याची ओळख पटवली. तब्बल आठ महिन्यांनंतर भोळे यांनी त्याचा चेहरा लक्षात ठेवून पोलिस व नायब तहसीलदार एल. एन. सातपुते यांच्यासमोर त्याची ओळख पटवली. पोलिसांनी सर्फराजला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी घेतली होती. सर्फराजने भोळे यांची सोनसाखळी श्रीरामपूर येथील महिलेस दिल्याची कबुली दिली. आता पोलिस कोठडी घेऊन पोलिस त्या महिलेचा शोध घेण्यासाठी त्याला सोबत घेऊन जाणार आहेत.