आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून 87 हजारांचा ऐवज लंपास; दागिन्यांसह बिलेही पळवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बाहेरगावी गेलेले सेवानिवृत्त सहायक आयुक्त दिलीप अंबादास जोशी (६०, रा. प्रतापनगर) यांच्या घरातून चोरट्यांनी ८० हजारांचे सोन्याचे दागिने व ७ हजार रुपये रोख पळवले. २४ डिसेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी २५ डिसेंबर रोजी उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जोशी प्रतापनगरातील श्रीरंग विलामध्ये राहतात. २३ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता ते पुणे येथे गेले होते. २४ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकत आतील कपाटाचे लॉकही तोडले. ८० हजारांचे सोन्याचे दागिने व ७ हजार रोख रकमेसह चोरट्यांनी पोबारा केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी दागिन्यांसह त्यांची बिलेही पळवली. पोलिस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटरवर असलेल्या परिसरात हा प्रकार घडला.

 

परिसरात दहशत : 
अंधार पडल्यानंतर अनेक टवाळखोर तरुण प्रतापनगर भागात रेंगाळतात. त्यांचा वावर वाढल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. याच दरम्यान रात्री व पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्यांसोबत लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...