Home | National | Other State | Thieves were using Google Maps to steal in Hyderabad

चोरी करण्यासाठी चक्क गुगल मॅपचा वापर करत होता चोर; दरवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन करत होता लाखोंच्या चोऱ्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 05:27 PM IST

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर चढवत होता मुखवटा

 • Thieves were using Google Maps to steal in Hyderabad

  चेन्नई- चोरी करण्यासाठी चोर कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही. तेलंगनातील हैदराबादमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. हा चोर श्रीमंतांच्या घरी चोरी करण्यासाठी चक्क गुगल मॅपचा वापर करत होता. गुगल मॅपचा वापर करुन हा चोर संबंधित ठिकाणांची माहिती घेऊन तिथिल श्रीमंतांच्या घरी चोरी करायचा. अनेकवेळा चोरी करुनही हा चोर पोलिसांना गुंगारा देत राहीला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमधील एका डॉक्टरची लुट झाल्याची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी या चोरीचा तपास लागला आणि अखेर त्यांनी या चोराला हैदराबादमधून अटक केली.

  एका अन्य प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर समोर आले सत्य

  एका महिन्याआधी चोरी करुनही पोलिसांना या चोराचा तपास लागत नव्हता. कारण चोरी केल्यानंतर त्याने एकही निशान मागे ठेवले नव्हते. त्यानंतर अनेक दिवसांपासून चेन्नईत अशा घटना घडल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करण्यास सुरुवात केली. अखेर तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तेलंगणा पोलिसांनी आंध्र प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला अन्य प्रकरणात अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानेच या चोरी केल्याचे कबूल केले. त्याची चौकशी करत असताना त्याने पोलिसांनी सांगितले की चोरी करण्यासाठी तो गुगल मॅपचा वापर करत होता.

  चोरी करण्यासाठी गुगल मॅपचा वापर

  तपासात समोर आल्यानुसार, चोर गुगल मॅपच्या सहाय्याने चेन्नईमधून वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती मिळवत होता. त्यानंतर त्या त्या ठिकाणांबद्दल माहिती मिळवून तिथे चोरी करायचा.

  ओळख लपवून पोलिसांच्या हातावर देत राहिला तुरी

  पोलिसांनी सांगितले की, चोरी केल्यानंतर तिथिल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेहरा दिसू नये यासाठी हा चोर दरवेळी आपल्या चेहऱ्यावर मास्क परिधान करत होता. यामुळेच पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरात त्याची ओळख पटत नसल्याने दरवेळी तो चोरी करुन पोलिसांना गूंगारा देत होता.

Trending