आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर भाड्याने देण्यापूर्वी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी; एक्सट्रा इन्कमच्या नादात होऊ शकतो तुरुंगवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - एक्स्ट्रॉ इन्कमसाठी अनेक लोक स्वतःचे घर अनोळखी लोकांना भाड्याने देतात. अनेक घरमालक घर भाड्याने देण्यापूर्वी आवश्यक असलेल्या काही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. यामुळे नंतर तेच अडचणीत सापडतात. घरमालकाच्या एक चुकीमुळे खूपमोठे नुकसान सहन करावे लागू शकते. उदा. तुम्ही भाड्याने घर दिलेल्या व्यक्तीचे पोलिस व्हेरिफिकेशन केले नसेल आणि तो व्यक्ती गुन्हेगार निघाला तर तुम्हीही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, घर भाड्याने देण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...


या गोष्टी ठेवाव्यात लक्षात...
- घर भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूची संपूर्ण माहिती तपासून घ्यावी.
- भाडेकरूचे पोलिस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे.
- पोलीस व्हेरिफिकेशनच्या फॉर्म संबंधित राज्य पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध असतो.
- भाडेकरूचे पोलिस व्हेरिफिकेशन केलेले नसल्यास घरमालकाला दंड भरावा लागू शकतो.
- घरमालकाने भाडेकरूचे काम आणि त्याच्या ऑफिसविषयीची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

 

रेंट अॅग्रीमेंट
- घर भाड्याने देण्यापूर्वी तोंडी चर्चा करून ऍग्रिमेंट करू नये. याउलट प्रॉपर नियम फॉलो करावेत. रेंट पेपर 11 महिन्याचे असावे कारण 12 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळाचे रेंट ऍग्रिमेंट करावयाचे असल्याचे भाड्याचे दर राज्यसरकार निश्चित करते.
- रेंट ऍग्रिमेंटमध्ये सिक्युरिटी डिपॉझिट, पेमेंट सायकल, भाडे देण्याची शेवटची तारीख, लेट पेमेंटचा दंड, प्राण्यांशी संबंधित नियम, घर रिकामे करण्याचे नियम आणि घर व्यवस्थित ठेवण्याचे नियम या सर्व गोष्टींचा उल्लेख अवश्य करावा.
- या व्यतिरिक्त घरमालक भाडेकरूला कोणकोणत्या सुविधा देणार आहे, याचीही माहिती ऍग्रिमेंटमध्ये देणे आवश्यक आहे.
- रेंट ऍग्रिमेंटवर घरमालक आणि भाडेकरूचे नाव एकदम स्पष्ट असावे. यासोबतच दोघांच्याही ऍग्रिमेंटवर स्वाक्षरी असावी.
- या व्यतिरिक्त भाड्याने देण्यात येणाऱ्या जागेचा उल्लेखही असावा.
- भांड्यामध्ये लाईट आणि पाणी बिलाचा समावेश असेल तर याचाही उल्लेख ऍग्रिमेंटमध्ये असावा.
- एकदा ऍग्रिमेंट पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 11 महिन्यांनी नवीन ऍग्रिमेंट करताना घरमालक 10 टक्क्यांनी भाडे वाढवू शकतो.
- रेंट ऍग्रिमेंट व्यतिरिक्तसुद्धा भाडेकरूने घर सोण्यापूर्वी आणि घरमालकाने घर रिकामे करायला सांगण्यापूर्वी एक महिन्यांची नोटीस देणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...