Home | Business | Auto | things you should know about insurance

चुकूनही गमवू नका गाडीची ओरिजनल चावी, अन्यथा Insurance Claim करणे ठरेल आव्हान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 03:36 PM IST

तज्ञांनी सांगितले गाडी चोरी झाल्यास काय आहे चावीचे महत्व ?

 • things you should know about insurance

  न्यूज डेस्क - आपल्याकडे गाडी असेल तर गाडीच्या दोन्ही ओरिजनल चाव्या जपून ठेवा. कारण त्याशिवाय, तुमचे इन्शुरन्सचे पैसे अडकू शकतात. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या भोपाळ विभागीय व्यवस्थापक एस.एन. डेल यांनी सांगितले की विमा कंपनीला विम्याचे पैसे दिल्यावर कंपनीला वाहनाची मालकी मिळते. जर चोरी झालेली गाडी भविष्यात सापडली तर विमा कंपनी त्यास कोर्टाद्वारे त्यांच्या ताब्यात घेईल आणि नंतर दुसऱ्याला विक्री करेल. अशा परिस्थितीत, विमा कंपनी ज्या व्यक्तीला गाडी विकली जाते त्यावेळेस गाडीच्या दोन्ही ओरिजनल चाव्या वाहनधारकास दिल्या जातात. म्हणूनच विम्याचा क्लेम करतेवेळी ओरिजनल चाव्या जमा केल्या जातात.

  हरवल्यास काय करावे?
  जर एखाद्या व्यक्तीची ओरिजनल चाव्या हरवल्या तर त्याने तात्काळ पोलिसांच्या अहवालात ती माहिती द्यावी लागेल. पोलिसांच्या तक्रारीवर आधारित, कंपनी विमा रक्कम भरते. तज्ञ म्हणतात की या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागतो आणि विमा घेणाऱ्या व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागतो, म्हणून ओरिजनल चाव्या सांभाळून ठेवणे चांगले असते.

  ...आणि काय जमा करावे लागेल?
  ओरिजनल चाव्यांव्यतिरिक्त, इन्शुरन्सची ओरिजनल पॉलिसी, रजिस्ट्रेशन कार्डची ओरिजनल पॉलिसी आदी क्लेमच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. बऱ्याच बाबतीत असे घडते की या कागदपत्रांसहित गाडी चोरीला जाते. अशावेळी या प्रकरणात केवळ पोलिस रिपोर्टच्या आधारे क्लेम दिला जातो. त्यामुळे रिपोर्टमध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

Trending