आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी २०२३ पासून चारदिवसीय कसाेटीचा विचार; दाेन वर्षांत ६०% कसाेटीचे निकाल तिसऱ्याच दिवशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कसाेटी  इतिहासात १९३९ मध्ये सर्वात लांब टेस्ट आफ्रिका आणि इंग्लंड संघांची ठरली. - Divya Marathi
कसाेटी इतिहासात १९३९ मध्ये सर्वात लांब टेस्ट आफ्रिका आणि इंग्लंड संघांची ठरली.
  • २०१८ ते १९ दरम्यान ८७ कसाेटी, याशिवाय ३५ कसाेटी सामन्यांचे निकाल पाच दिवसांत लागले
  • गुरुवार- रविवार पर्यंत सामने,९८ षटकांचा असेल दिवसाचा खेळ

दुबई - झटपट  टी-२० सारख्या फाॅरमॅटच्या क्रिकेटमुळेच पारंपरिक कसाेटीच्या चाहत्यामध्ये माेठ्या संख्येत घसरण हाेत असल्याची भीती सातत्याने व्यक्त केली जात आहे. मात्र, या कसाेटीकडे जुन्यांसह आता नव्या चाहत्यांनाही जाेडण्यासाठी आयसीसीकडून वेळाेवेळी पुढाकार घेण्यात आला आहे. आता याच कसाेटी क्रिकेटला अधिक राेमांचक आणि लक्षवेधी करण्याच्या इराद्याने आयसीसीने नवीन याेजना आखली आहे. यातूनच आता आगामी २०२३ पासून चारदिवसीय आंतरराष्ट्रीय कसाेटी सामन्यांचे आयाेजन करण्याचा आयसीसीचा विचार आहे. याच दृष्टीने आयसीसीने हालचालींना सुरुवात केली आहे. कारण गत दाेन वर्षांत झालेल्या ६० टक्केपेक्षा अधिक कसाेटीचा निकाल हा चार वा त्यापेक्षा कमी दिवसांत म्हणजेच तिसऱ्याच दिवशी समाेर आला आहे. यातूनच आता चारदिवसीय कसाेटीमुळे चाहत्यांचा याकडचा कल वाढण्यास अधिक मदत हाेईल, असा आयसीसीचा मानस आहे. 

आयसीसीने २०२३ पासून आता प्रत्येक एक स्पर्धा आयाेजित करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० च्या सामन्यांमुळे कसाेटीच्या संख्येत कपात करण्यात येत आहे. त्यामुळेच आता या कसाेटी सामन्यांच्या संख्येत वाढ करण्याचा आयसीसीचा प्रयत्न असेल.गुरुवारपासून रविवारदरम्यान हाेणार कसाेटीचे सामने


चारदिवसीय कसाेटीचा सामना हा गुरुवारपासून रविवारपर्यंतच्या आयाेजनाचा प्रस्ताव आहे. यामुळे महिन्यातील दाेन वीकेंडमुळे चाहत्यांची माेठी गर्दी या कसाेटी सामन्यांना लाभू शकताे, असा विश्वास आयसीसीने व्यक्त केला. गाेल्फ आणि इतर खेळाच्या माेठ्या इव्हेंटचे आयाेजन अशाच पद्धतीने खास करून सुटीच्या दिवशी करण्यात येते. आता आयसीसीच्या नियमानुसार या चार दिवसांत दिवसाकाठी ९८ षटकांचा खेळ हाेणार आहे. 

फ्लड लाइट अधिक गरजेचा 


प्रत्येक दिवशी एका तासाने खेळात वाढ हाेणार आहेत. त्यामुळेच सामन्याच्या वेळापत्रकात माेठा बदल हाेईल. अशात हे सामने संध्याकाळपर्यंत चालणार आहेत. यातूनच या सामन्यांच्या आयाेजित मैदानावर फ्लड लाइटची व्यवस्था करणे गरजेचे असणार आहे.सर्वात दीर्घ १२  दिवसांपर्यंत रंगली कसाेट


कसाेटी क्रिकेटचा इतिहास हा अधिकच रंगतदार आहे. १९३९ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील कसाेटीची  मॅरेथाॅन लढत रंगली हाेती. हा कसाेटी सामना १२ दिवसांपर्यंंत चालला हाेता. निकाल लागेपर्यंत कसाेटी सामना खेळण्याचा त्या काळात नियम हाेता. यामुळे ३ मार्च राेजी सुरू झालेल्या या कसाेटीचा निकाल १४ मार्च राेजी लागला हाेता.  या दाेन दिवस विश्रांती हाेती. कारण, पावसाच्या व्यत्ययामुळे यादरम्याना खेळ हाेऊ शकला नाही. आफ्रिकेने पहिल्या डावात ५३० व दुसऱ्या डावात ४८१ धावा काढल्या.  प्रत्युत्तरात  इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात ३१६ धावा आणि दुसऱ्या डावात ५ गड्यांच्या माेबदल्यात ६५४  धावा काढल्या.


 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची चारदिवसीय कसाेटीला पसंती

कसाेटीकडे चाहत्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या आयसीसीच्या माेहिमेला आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) पाठबळ लाभले आहे. यातूनच सीएने आता आयसीसीच्या चारदिवसीय कसाेटी सामन्याच्या आयाेजनाला पहिली पसंती दिली आहे. या कसाेटी सामन्यांच्या आयाेजनाचा आमचा आग्रह आहे. यातूनच आम्ही माेठ्या संख्येतील चाहत्यांचे लक्ष याकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरणार आहाेत, अशी प्रतिक्रीया क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिक केविन रॉबर्टसन यांनी दिली. याशिवाय आम्ही आयसीसीच्या या निर्णयाचे स्वागत करण्यास उत्सुक आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. यातूनच आता आयसीसीकडून २०२३ पासून चारदिवसीय कसाेटी सामन्याच्या आयाेजनाच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच देशांच्या संघांच्या भूमिकेकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.