आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी कसाेटी/ चाैथा दिवस : बुमराहच्या 'पंच'ने इंग्लंड टीमचा दाणादाण!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाॅटिंगगहॅम- टीम इंडियाचा मालिकेतील पहिला विजय अाता अवघ्या एका पावलावर येऊन ठेपला अाहे. जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेऊन भारतीय संघाचा अाता यजमान इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसाेटीतील विजय जवळपास निश्चित केला. त्याने खडतर लक्ष्यचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड टीमची दाणादाण उडवली. त्यामुळे या संघाला चाैथ्या दिवसअखेर १०२ षटकांत मंगळवारी दुसऱ्या डावात ९ गडी गमावून ३११ धावा काढता अाल्या. 

 

अद्याप २१० धावांनी पिछाडीवर असलेल्या यजमान इंग्लंड संघाकडे १ विकेट शिल्लक अाहेत. भारताने दुसरा डाव ३५२ धावांवर घाेषित केला. यासह भारताने यजमानांसमाेर विजयासाठी ५२१ धावांचे खडतर अाव्हान ठेवले. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची निराशाजनक सुरुवात झाली. यातून भारतीय संघ अाता विजयापासून एका पावलावर अाहे. भारताकडून बुमराहने पाच, इशांत शर्माने दाेन विकेट घेतल्या. यामुळे इंग्लंडची चांगलीच दमछाक झाली. 


इंग्लंडने कालच्या बिनबाद २३ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. कुक अाणि जेनिंग्सने दमदार खेळीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा सकाळच्या पहिल्या सत्रात फार काळ निभाव लागला नाही. यातूनच अवघ्या चार धावांची भर घालत सलामीचा जेनिंग्स पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला इशांतने झेलबाद केले. त्यामुळे ताे १३ धावांचे याेगदान देत बाद झाला. 


त्यापाठाेपाठ इशांतने संघाला दुसरा बळी मिळवून दिला. त्याने कुकला बाद केले. यासह कुकने १७ धावांची खेळी करत पॅव्हेलियन गाठले. सलगच्या दाेन विकेटमुळे अडचणीत सापडलेल्या इंग्लंडला सावरण्यासाठी कर्णधार रुटने पुढाकार घेतला. मात्र, त्याला अाव्हान कायम ठेवता अाले नाही. 

 
बटलर-स्टाेक्सची शतकी भागीदारी 
इंग्लंड संघावरचे पराभवाचे सावट दूर करण्यासाठी बटलर व स्टाेक्सने पाचव्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी रचली. बटलरने १७६ चेंडूंत २१ चाैकारांसह १०६ धावांची खेळी केली. स्टाेक्सने १८७ चेंडूंत ६२ धावा काढल्या. 

बातम्या आणखी आहेत...