आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुम..बुम.. बुमराह! ऑस्ट्रेलियाचा संघ 151 धावांत गारद, बुमराहच्या 6 विकेट, दुसऱ्या डावात भारतला एक धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज आणि विशेषतः बुमराहच्या गोसलंदाजीच्या जोरावर भारताने मोठी आघाडी घेतली आहे. बुमराहने घेतलेल्या 6 विकेट्सच्या जोरावर भारताने कांगारूंचा संपूर्ण डाव 151 धावांच गुंडाळला. त्यामुळे पहिल्या डावात भारताला 292 धावांची आघाडी मिळाली. फॉलोऑन देण्याची संधी असूनही भारतीय संघ परत फलंदाजीला उतरला. हनुमा विहारीच्या रुपात भारताला लवकर पहिला धक्कादेखिल बसला आहे. 


ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात 
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. इशांत शर्माने तिसऱ्याच ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर अॅरॉन फिंचला बाद करत पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मार्क्स हॅरिसला जसप्रित बुमराहने बाद केले. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्शही लंचपूर्वीच बाद झाले. लंचनंतरही ऑस्ट्रेलियाची स्थिती फारशी चांगली राहिली नाही. जसप्रित बुमराहने एकापाठोपाठ एक धडाका लावला आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव 151 धावांत गारद झाला. 


बुमराहच्या 6 विकेट 
बुमराह पहिल्या डावात भारतीय गोलंदाजीचा हिरो ठरला बुमराहने हॅरीस, मार्श, हेड, पेन, लियॉन आणि हेजलवूड या सहा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले. 15 ओव्हरमध्ये 33 धावा देत त्याने या सहा विकेट्स घेतल्या. बुमराहशिवाय जडेजाने 2 तर इशांत आणि शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

 

बातम्या आणखी आहेत...