Home | Sports | From The Field | third day of fourth test match between india and england in Southampton

चाैथी कसाेटी/ तिसरा दिवस : इंग्लंडच्‍या दुसऱ्या डावात 8 बाद 260 धावा, शमीचे तीन बळी

वृत्तसंस्था | Update - Sep 02, 2018, 10:08 AM IST

साऊथम्पटन - सॅम कुरनच्या (नाबाद ३७) अाणि जाेस बटलरच्या (६९) शानदार खेळीच्या बळावर इंग्लंड संघाने शनिवारी भारतविरुद्ध चाै

 • third day of fourth test match between india and england in Southampton

  साऊथम्पटन - सॅम कुरनच्या (नाबाद ३७) अाणि जाेस बटलरच्या (६९) शानदार खेळीच्या बळावर इंग्लंड संघाने शनिवारी भारतविरुद्ध चाैथ्या कसाेटीत दमदार पुनरागमन केले. यजमानांनी दुसऱ्या डावात दिवसअखेर ८ गड्यांच्या माेबदल्यात २६० धावा काढल्या. यातून इंग्लंडला २३३ धावांची अाघाडी घेता अाली. अाता टीमचा युवा प्रतिभावंत फलंदाज सॅम कुरन हा मैदानावर कायम अाहे.

  टीम इंडियाच्या गाेलंदाज शमीने तिसऱ्या दिवशी तीन बळी घेतले. तसेच ईशांतने २ बळी घेतले. यासह त्याने इंग्लंडच्या माेठ्या अाघाडीच्या प्रयत्नावर पाणी फेरले. दरम्यान, जसप्रीत बुमराह अाणि अार.अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला. यजमान इंग्लंडने तिसऱ्या दिवशी कालच्या बिनबाद ६ धावांवरून खेळण्यास सुुरुवात केली. सलामीवीर कुक १२ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.


  बटलरचे अर्धशतक : इंग्लंडच्या जाेस बटलरने शानदार खेळी करताना अापले कसाेटी अर्धशतक साजरे केले. त्याने १२२ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकारांच्या अाधारे ६९ धावांची शानदार खेळी केली.

  रुटचे अर्धशतक हुकले
  दरम्यान, ज्याे रुटनेही संयमी खेळी करताना मैदानावर अापले अाव्हान टिकवून ठेवले. यातून त्याने अर्धशतकाचा उंबरठा गाठला. ताे अवघ्या दाेन पावलांवर हाेता. मात्र, चाेरटी धाव घेताना त्याला शमीने बाद केले. यामुळे रुट हा ४८ धावांवर बाद झाला. त्याचे अर्धशतकाचे स्वप्न यादरम्यान भंगले.
  दरम्यान, ज्याे रुटनेही संयमी खेळी करताना मैदानावर अापले अाव्हान टिकवून ठेवले. यातून त्याने अर्धशतकाचा उंबरठा गाठला. ताे अवघ्या दाेन पावलांवर हाेता. मात्र, चाेरटी धाव घेताना त्याला शमीने बाद केले. यामुळे रुट हा ४८ धावांवर बाद झाला. त्याचे अर्धशतकाचे स्वप्न यादरम्यान भंगले.

Trending