आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी आघाडी : 11 पक्षांची मोट केवळ कल्पना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत असेही काही राजकीय पक्ष उतरले आहेत की, ज्यांनी ना एनडीए स्वीकारले ना युपीए सरकारला. तथापि, यापैकी कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सदस्य जरूर राहिलेले आहेत. काही जण तर दोन्ही आघाड्यांमध्ये सामील झालेले होते. याचे कारण स्वच्छ आहे. निवडणुकीनंतरच्या चित्राची सर्वांना प्रतिक्षा आहे. जर भाजपला मदतीची गरज पडलीच तर त्याची चांगली किंमत ते वसूल करतीलच. जर कधी भाजप व त्याच्या मित्रपक्षां इतक्याच जागा या छोट्या राजकीय पक्षांना मिळाल्या तर युनायटेड फ्रॅट च्या तालावर पुन्हा एकदा छोटे-छोटे राजकीय पक्ष आपले सरकार बनवतील. आणि हे सुद्धा जाहीरच आहे की, कॉंग्रेस या तिसर्‍या आघाडीला बाहेरून पाठिंबा देईल.
डाव्या पक्षांपैकी सीपीआईचे राष्ट्रीय सचिव अतुल अंजान म्हणतात की, तिसर्‍या आघाडीचा मूलभूत विचारच हा आहे की, देशात बिगर कॉंग्रेसी व बिगर भाजपचे सरकार सत्तेत यावे. हे छोटे छोटे पक्ष सुरूवातीपासूनच या दोन्ही पक्षांपासून अंतर राखूनच वाटचाल करीत आहे. आम्ही तर गृहित धरून चाललो आहोत की, ते तिसर्‍या आघाड़ीबरोबरच आहेत. तथापि, तिसर्‍या आघाडीच्या ममता बॅनर्जी व मायावती यांच्याप्रमाणेच यापैकी सर्वांच्या भूमिका अतिशय ताठर आहेत. परंतू , निवडणुकीनंतर त्या सुद्धा आघाडी समवेतच असल्याचे दृष्टीस पडणार आहे, हे निश्चित.
या क्षणाला तरी, तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक, ओरिसात बिजू जनता दल, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी दोन्हीही, बिहारमध्ये जनता दल (यु), हरियाणामध्ये इंडियन नॅशनल लोकदल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची तृणमूल कॉंग्रेस हे सर्व पक्ष असेच आहेत. त्यांच्या बरोबरच डाव्या पक्षापैकी चार उपपक्ष, आणि आंध्रप्रदेशातील तीन पक्ष मिळून एक मजबूत आघाडी जन्मास येऊ शकते. मात्र सर्व पक्षांना उत्सुकता लागून आहे ती या निवडणुकीच्या निकालांचीच. याचे दोन फायदे आहेत, पहिला हाच की जादा जागांवर लढण्याची संधी मिळेल आणि दुसरे असे की, जास्तीत जास्त मते मिळतील. त्यानंतरही निवडणूक संपताच आघाडीची मोट बांधताना जास्तीत जास्त मंत्रिपदे पदरात पाडून घेता येईल. तथापि, यावेळी अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष सगळ्याच राज्यात निवडणूक लढवित आहे. परंतू त्यातील सगळ्याच जागा त्यांना जिंकता येतील अशी शक्यता नाही.
जदयू चे खासदार के.सी. त्यागी यांचे म्हणणे असे आहे की, तिसर्‍या आघाडीचा सद्यस्थितीतील अन्वयार्थच असा आहे की, कॉंग्रेसी व भाजप सरकारला सत्तेपासून दूर राखणे. निवडणुकीनंतर या दोन्ही मोठय़ा पक्षांना दूर सारून सत्ता स्थापण्यासाठी तिसर्‍या आघाडीचे घोडे पुढे दामटणे यासाठीच हे सर्व छोटे पक्ष एकत्र येतील. केजरीवाल यांचा पक्ष जर काही जागा जिंकून आलाच तर त्यांनाही सामील करून घेण्यास हे पक्ष मागेपुढे पाहणार नाहीत. मात्र समाजवादी पार्टी सारख्या काही मोठय़ा पक्षांना सध्या तरी आम आदमी पार्टीबद्दल काहीएक भाष्य करायला आवड़त नाही. पक्षाचे नेते व खासदार नरेश अग्रवाल म्हणतात, सध्या तरी केजरीवाल यांची लाट ही केवळ दूध उकळल्यासारखी बघणे र्शेयस्कर ठरेल. निवडणुकीनंतर जर आप ला काही जागा मिळाल्याच तरच काहीतरी रणनीती आखता येईल.
कोणत्याही आघाडीत सामील होण्याची शक्यता नाही : आप
आम आदमी पार्टीने तिसर्‍या आघाडीक़डून आलेल्या या सर्व संकेतांना धुडकावून लावले असून, स्वत:ला पूर्णत: वेगळे संबोधले आहे. पक्षाचे प्रवक्ता दीपक वाजपेयी म्हणाले, निवडणुकीपूर्वी वा नंतरही कोणत्याही आघाडीत सामील होण्याची सूतराम शक्यता नाही. तसा कोणताही प्रश्नच उरत नाही. पक्ष सरकार बनविण्यासाठी कोणाचेही सर्मथन घेणार नाही वा देणार नाही.
दोन निवडणुकीतील तिसर्‍या आघाडीची स्थिती
स्टेटस् रिपोर्ट : 2009 मधील निवडणुकीत तिसर्‍या आघाडीने 302 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 58 जागा त्यांनी जिंकल्या. सपा ने वेगळी चूल बांधत 193 जागा लढविल्या. त्यापैकी 23 केवळ जिंकता आल्या. तर बहुजन समाज पार्टीला केवळ 21 जागाच जिंकता आल्या होत्या.
2004 च्या निवडणुकीत डाव्या पक्षांनी सपा बरोबर तिसरी आघाडी जुळविताना आवाहन केले होते की, डावे पक्ष 120 जागा लढवतील. त्यांना केवळ 61 जागा जिंकता आल्या. सपा 237 जागा लढवून 36 जागांवर विजयी झाली. अन्य पक्ष निवडणुकीनंतर युपीए व एनडीए मध्ये सामील झाले होते.