Home | Maharashtra | Mumbai | Third Gender Murder in Pune

पुण्यात तृतीयपंथीयाचा गळा चिरून खून, या सदनिकेमध्ये आढळून आला मृतदेह

प्रतिनिधी | Update - Mar 11, 2019, 07:52 PM IST

वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये बॅक स्टेजला डान्सर म्हणून काम करत होता.

  • Third Gender Murder in Pune

    पुणे- पुण्यातील महंमदवाडी परिसरात एका तृतीयपंथीयाचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह सदनिकेमध्ये आढळून आला. वानवडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.

    अरबाज आबिद शेख (20,रा ईशाका इमारत, हांडेवाडी,पुणे) असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. तो वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये बॅक स्टेजला डान्सर म्हणून काम करत होता. सदनिकेत तो एकटाच रहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेजारच्यांनी खबर दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदनिकेमध्ये अरबाज शेख याचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयता पाठवला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.

Trending