आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Third Movie Of 'Munnabhai' Series Closed, Bowman Irani Says Makers Didn't Like The Story

'मुन्नाभाई' सीरीजचा तिसरा पार्ट झाला बंद , बोमन ईरानीने सांगितले यामागचे कारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'मुन्नाभाई' फ्रॅन्चायसी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. राजकुमार हिराणी यांच्या या चित्रपटाच्या मेकिंगबद्दल सस्पेंस अजूनही कायम आहे. पण याचे आधीचे दोन पार्ट्स 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' मध्ये महत्वाची भूमिका साकारलेल्या बोमन ईरानी यांनी सांगितल्याप्रमाणे चित्रपट बंद झाला आहे. त्यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीतदरम्यान हे वक्तव्य केले आहे.  

मेकर्सला चित्रपटाची कथा आवडली नाही... 
बोमन यांनी सांगितले, "लोकांना अजूनही वाटते की, तिसरा पार्ट अंडर प्रोडक्शन आहे. पण हे सत्य नाही. चित्रपट बंद झाला आहे. याची कथा लिहिली गेली होती. पण स्वतः मेकर्सलाच ती आवडली नाही. मागील दोन्ही पार्ट्ससोबत ही कथा मिळती जुळती झाली नाही. त्यामुळे ते हा चित्रपट बनावत नाहीयेत. सत्य हे देखील आहे की, जर मुन्नाभाई सीरीजच्या पुढच्या पार्टची घोषणा करून एखादा अॅव्हरेज चित्रपट बनवला तर तो देखील चालेल. पण फ्रॅन्चायसीचा असा काही हेतू नाही. मेकर्सची अशी अजिबात इच्छा नव्हती की, पुढच्या पार्टमुळे प्रेक्षक निराश होवो."

'मेड इन चायना' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत बोमन... 
बोमन सध्या आपला आगामी चित्रपट 'मेड इन चायना' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. मिखिल मुसलेच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज होईल. चित्रपटात राजकुमार राव आणि मौनी रॉयचा लीड रोल आहे. बोमन यामध्ये एका डॉक्टरची भूमिका साकारणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...