Home | Business | Personal Finance | third party motor insurance price No hike in 2019

तुम्हीसुद्धा कार किंवा बाईकचा इन्श्युरन्स काढणार असाल तर जाणून घ्या ही गोष्ट, IRDAI ने सांगितले 1 एप्रिल 2019 मध्ये ग्रा

बिझनेस डेस्क | Update - Apr 01, 2019, 12:32 PM IST

आता गाडीचा इन्श्युरन्स काढण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील, जाणून घ्या

 • third party motor insurance price No hike in 2019

  कार, बाईकचा इन्श्युरन्स काढणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IRDAI ने बाईक, कार आणि कमर्शिअल वाहनधारकांसाठी थर्ड पार्टी इन्श्युरन्सच्या प्रीमियममध्ये कोणतीही वाढ करणार नसल्याचे म्हटले आहे. सामान्यतः प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये इन्श्युरन्सचे दर दहा ते चाळीस टक्के वाढतात. IRDAI थर्ड पार्टी इन्श्युरन्सचे दर निश्चित करते. गुरुवारी आयआरडीने सांगितले की, 1 एप्रिल 2018 मध्ये लागू करण्यात आलेले प्रीमियम दरच या आर्थिक वर्षातही तसेच राहतील. म्हणजे तुम्हाला मागील वर्षाएवढाच प्रीमियम या वर्षी द्यावा लागेल.


  सध्या किती लागत आहे पैसा
  - 75 सीसीपेक्षा कमी इंजिन असलेल्या टू-व्हीलर वाहनांचे दर 427 रुपये आहेत.
  - 75 ते 150 सीसीपर्यंतचे इंजिन असलेल्या टू-व्हीलर वाहनांना 720 रुपये प्रीमियम भरावा लागले.
  - लहान कारसाठी 1850 रुपये प्रीमियम आहे. एसयूव्हीसाठी 7890 रुपये प्रीमियम जमा करावा लागले. लहान टॅक्सीसाठी 5437 रुपये आणि मोठ्या कमर्शिअल कारसाठी वर्षाला 7147 रुपये प्रीमियम भरावा लागले.


  एखाद्याने फसवल्यास येथे तक्रार करू शकता
  - अनेकवेळा एजंट चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकतात. अशावेळी तुम्ही मध्ये तक्रार करू शकता.
  - यासाठी तुम्हाला सर्वात पहिले विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क करावा लागेल.
  - येथून समाधान न झाल्यास तुम्ही irdai च्या तक्रार निवारण केंद्र टोल फ्री नंबर 155255 वर तक्रार दाखल करू शकता.
  - सर्व कागदपत्रांसहित irdai च्ये ईमेल आयडीवर तक्रार पाठवू शकता : complaints@ irdai.gov.in
  - येथेही समस्येचे समाधान न झाल्यास तुम्ही विमा लोकपालपर्यंत तुमची तक्रार पोहचवू शकता.

Trending