आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Third Test: England Lead By 2 0, India Waiting For First Victory In Series

तिसरी कसाेटी : भारतासाठी करा वा मरा, इंग्लंडची २-० ने अाघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाॅटिंगहॅम- नंबर वन टीम इंडिया अाता सलगच्या पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी सज्ज झाली अाहे. यासाठी भारतीय संघाची कसाेटी लागणार अाहे. भारत अाणि यजमान इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसाेटी सामन्याला अाज शनिवारपासून सुरुवात हाेत अाहे. नाॅटिंगहॅमच्या मैदानावर हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. भारतीय संघासाठी ही कसाेटी 'करा वा मरा' अशी अाहे. त्यामुळे अाता दाैऱ्यातील अापली प्रतिष्ठा जपण्यासाठी दमदार पुनरागमन करत तिसरी कसाेटी जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस अाहे. 


दुसरीकडे सलगच्या विजयाने यजमान इंग्लंड संघाने पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने अाघाडी घेतली.अाता नार्टिंगहॅम कसाेटी विजयाने यजमानांना घरच्या मैदानावरील ही मालिका अापल्या नावे करता येईल. याच विजयी अाघाडीच्या इराद्याने यजमान इंग्लंडचा संघ मैदानावर उतरणार अाहे. 

 

भारतासमाेर अाव्हान
सलगच्या दाेन्ही कसाेटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. मात्र, अाता या पराभवाला दूर सारून विजयी ट्रॅकवर येण्यासाठी भारताचा संघ उत्सुक अाहे. यासाठी टीमला फलंदाजीमधील अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची गरज अाहे. यामधील अपयशाने भारताला दाेन्ही कसाेटी गमवाव्या लागल्या. त्यामुळे काेहलीच्या नेतृत्वात अाता अाघाडीच्या फळीकडून माेठ्या खेळीची अाशा अाहे. यातून टीमला इंग्लंडचा विजयी रथ राेखता येईल. 


काेहली खेळणार 
सध्या फिटनेस हा कर्णधार विराट काेहलीसाठीचा चिंतेचा विषय अाहे. अनफिटमुळे त्याला समाधानकारक खेळी करता अाली नाही. यातून भारताला दुसऱ्या कसाेटीत पराभवाचा सामना करावा लागला. दुखापतीमुळे विश्रांती घेणार असल्याने ताे तिसऱ्या कसाेटीत खेळणार नसल्याची चर्चा हाेती. मात्र, यावर त्याने पडदा टाकला. अापण या ठिकाणी खेळणार असल्याने त्याने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...