आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाॅटिंगहॅम- नंबर वन टीम इंडियाच्या ऋषभ पंतने शनिवारी अांतरराष्ट्रीय कसाेटीमध्ये पदार्पण केले. त्याने यजमान इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसाेटीतून अापल्या करिअरला सुरुवात केली. यासह ताे भारताचा २९१ वा कसाेटीपटू ठरला. याशिवाय २० वर्षीय ऋषभ हा भारताचा पाचवा सर्वात युवा यष्टिरक्षक ठरला. तसेच भारताचा ताे ३६वा विकेटकीपर अाहे.
भारत अाणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवशी पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ६ गड्यांच्या माेबदल्यात ३०७ धावांची खेळी केली. विराट काेहली (९७) अाणि रहाणेने (८१) वैयक्तिक अर्धशतकेही साजरी केली.
धवन-लाेकेशची अर्धशतकी भागीदारीची सलामी : भारतीय संघाकडून सलामीवीर शिखर धवन (३५) अाणि लाेेकेश राहुलने (२३) दमदार सुरुवात केली. या दाेघांनी संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. त्यांनी ६० धावांची भागीदारी रचली. धवनने ६५ चेंडूंत ७ चाैकारांसह ३५ धावा काढल्या.
ऋषभ पाचवा युवा : भारताचा २० वर्षीय ऋषभ हा पाचवा युवा यष्टिरक्षक ठरला. त्याने २० वर्षे ३१८ व्या दिवशी पदार्पण केले. सर्वात कमी वयात पार्थिवने पदार्पण केेले हाेते. त्याने १७ वर्षे १५२ व्या दिवशी २००२ मध्ये करिअरला सुरुवात केली. यादरम्यान दिनेश कार्तिक (१९ वर्षे, १५५ दिवस), बुधीकुंदरन (२० वर्षे, ९१ दिवस), अजय (२० वर्षे, १२७ दिवस) यांचा समावेश अाहे.
रहाणे चमकला
भारताकडून अंजिक्य रहाणेने पहिल्या डावात संयमी खेळी करताना संघाच्या धावसंख्येला गती दिली. याशिवाय त्याने काेहलीला माेलाची साथ दिली. रहाणेने १३२ चेंडूंत १२ चाैकारासह ८१ धावांची खेळी केली. तसेच शतकी भागीदारी रचली.
वाेक्सचे ३ बळी
यजमान इंग्लंडच्या क्रिस वाेक्सने घरच्या मैदानावर शानदार गाेलंदाजी केली. यातून त्याने तीन विकेट घेतल्या. यासह त्याने टीम इंडियाची डाेकेदुखी वाढवली. त्याने सलामीच्या शिखर धवनसह लाेकेश राहुल अाणि चेतेश्वर पुजाराला बाद केले.
काेहलीचे शतक हुकले
सलगच्या पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी कर्णधार विराट काेहली दुखापतीमधून सावरला. त्याने तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात शानदार अर्धशतक साजरे केले. त्याचे करिअरमधील हे १८ वे कसाेटी अर्धशतक ठरले. त्याचे तीन धावांनी शतक हुकले. त्याने १५२ चेंडूंचा सामना करताना ९७ धावा काढल्या. यात ११ चाैकारांचा समावेश अाहे. त्याने रहाणेसाेबत चाैथ्या विकेटसाठी अभेद्य १०७ धावांची भागीदारी रचली. यामुळे धावसंख्येचा अालेख उंचावला.
पुढील स्लाइडवर पाहा, धावफलक...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.