आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी कसाेटी/ दुसरा दिवस: हार्दिकने उडवला इंग्लंडचा धुव्वा; भारताला २९२ धावांची अाघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तसंस्था- नाॅटिंंगहॅम- युवा गाेलंदाज हार्दिकने (५/२८) तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात यजमान इंग्लंड संघाचा अवघ्या १६१ धावांवर धुव्वा उडवला. यासह टीम इंडियाला पहिल्या डावात १६८ धावांची अाघाडी मिळाली. त्यानंतर भारताने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात दिवसअखेर रविवारी ३१ षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात १२४ धावा काढल्या. यासह भारताने २९२ धावांची अाघाडी घेतली.  अाता चेतेश्वर पुजारा (३३) अाणि विराट काेहली (८)  मैदानावर खेळत अाहेत. 


सलगच्या पराभवाची मालिका खंडित करत विजयी ट्रॅकवर येण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली अाहे. यातू्नच भारताने पहिल्या डावात ३२९ धावांची खेळी केली.  त्यानंतर मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या यजमान इंग्लंडची दमछाक केली. ईशांत शर्मा अाणि हार्दिक पांड्याने  पहिल्या डावात  इंग्लंडची दाणादाण उडवली.  भारताने कालच्या ६ बाद ३०७ धावांवरून दुसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली हाेती. 


हार्दिकचा पहिल्यांदा पंच 
हार्दिकने पंच मारल्याने यजमान इंग्लंडला दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात सुमार खेळीचा माेठा फटका बसला.  यजमानांच्या अव्वल फलंदाजांना ईशांत अाणि हार्दिकसमाेर फार काळ अापला निभाव टिकवून ठेवता अाला नाही.  हार्दिकने ६ षटकांत २८ धावा देत ५ बळी घेतले. त्याने प्रथमच डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम गाजवला. 

बातम्या आणखी आहेत...