Home | Sports | From The Field | third time Virat Kohli Wisden Leading Cricketer In The World

क्रिकेटचे बायबल म्हटल्या जाणाऱ्या मासिकाने सलग तिसऱ्या वर्षी विराटची ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून केली निवड

वृत्तसंस्था | Update - Apr 11, 2019, 08:52 AM IST

सलग तिसऱ्या वर्षी विराटची ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड

 • third time Virat Kohli Wisden Leading Cricketer In The World

  लंडन - क्रिकेटचे बायबल म्हटल्या जाणाऱ्या मासिक विस्डेनने सलग तिसऱ्या वर्षी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या श्रेष्ठतेवर शिक्कामोर्तब केले. विस्डेनने विराटला अव्वल क्रिकेटर ऑफ द इयर पुरुष म्हणून निवड केली. तो सलग तिसऱ्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला. २०१७ व २०१८ मध्येदेखील विराटची सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. भारतासाठी दुहेरी आनंदाची गोष्ट ठरली आहे. महिला क्रिकेट टीमची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधानाची क्रिकेटर ऑफ द इयर महिला गटात निवड केली. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला टी-२० चा अव्वल खेळाडू म्हणून मान मिळाला.


  त्यासह विस्डेनने ५ सर्वश्रेष्ठ खेळाडू निवडले. यातदेखील विराटचा समावेश आहे. त्याच्यासह इंग्लंडचा जोस बटलर, सॅम करेन, महिला क्रिकेटर रोरी बर्न्स व टॅमी ब्यूमांेट हे पाच खेळाडू आहेत. विस्डेनने विराटच्या इंग्लंड दौऱ्यातील फलंदाजीचे विशेष कौतुक केले. मासिकाने म्हटले की, विराटने इंग्लंडमध्ये कसोटीत शानदार फलंदाजी केली. वनडेतदेखील त्याने ही लय कायम ठेवली. त्यानंतरही काही शिल्लक राहिले असेल, तर त्याच्याकडे त्याने माेर्चा वळवला आहे.


  विराटच्या इंग्लंडमध्ये २ शतकांसह ५९३ धावा, तेव्हा विस्डेनदेखील चाहता झाला
  विस्डेनने इंग्लंडमध्ये विराटच्या फलंदाजीचे कौतुक केले. त्याचे कारणही मोठे होते. भारतीय टीम २०१४ दौऱ्यात इंग्लंडमध्ये गेल्यावर विराट अपयशी ठरला होता. इंग्लिश गोलंदाजांनी सलग ५ कसोटीत विराटला एकाच्या जागेवर बाद केले. यादरम्यान १३.५० च्या सरासरीने त्याने अवघ्या १५४ धावा काढल्या. मात्र, विराटने इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंड गोलंदाजांची धुलाई केली. ५ कसोटीत ५९.३० च्या सरासरीने त्याने ५९३ धावा काढल्या. यात दोन शतकांचा समावेश आहे.


  मंधानाने एका वर्षात ७७ च्या सरासरीने धावा काढल्या
  महिला क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाचे प्रदर्शन गेल्या वर्षभरात चांगले राहिले. तिची सलग दुसऱ्या वर्षी महिलांमधील अव्वल क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. स्मृती मंधानाने एका वर्षात १० वनडे सामने खेळले. त्यात ७७ च्या सरासरीने ५४० धावा ठोकल्या. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत ती मालिकावीरदेखील ठरली होती. मंधानाने यादरम्यान २२ टी-२० सामने खेळले, त्यात ५३१ धावा काढल्या. या जबरदस्त प्रदर्शनामुळे तिच्याकडे हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारतीय टी-२० संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.


  गेल्या एक वर्षात विराट
  - ११ कसोटी १०५९ धावा, १४९ सर्वोच्च, ५५.७३ सरासरी ४ शतके
  - १९ वनडे १२५५ धावा, १५७* सर्वोच्च ७३.८२ सरासरी ६ शतके
  - १० टी २० त २८० धावा ७२* सर्वोच्च ४६.६६ सरासरी ० शतक

Trending