आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यावरून पडणार तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कौन बनेगा करोडपती’मधील एका भागात पाण्याची कमतरता तसेच अपव्ययाबाबत भारत अग्रस्थानी असल्याचे समोर आले. जमिनीतील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. यावर्षी अनेक ठिकाणी सरासरीहून जास्त पाऊस झाला. मात्र, पाण्याची साठवणूक आपण करू शकलो नाही. इंदूरमध्ये विभावरी नामक संस्था हे काम करत आहे. घरात पाण्याचा नळ बंद केल्यानंतरही थेंब-थेंब पाणी ठिबकत राहते. हा अपव्यय आपण समजून घेत नाही. तिसरे महायुद्ध पाण्यासाठी लढले जाईल, अशी शक्यता अनेक वर्षांपूर्वी वर्तवण्यात आली आहे. पाण्याची गरज ग्रामीण भागात जास्त आहे. मात्र महानगरांना पुरवठा केला जातोय. महानगरे ही श्रीमंत लोकांची वसाहत. बहुतांश कॉर्पोरेट कार्यालये महानगरांतच थाटली आहेत. देशातील बँकांतून निघणारा पैसा महानगरांतच पोहोचतो. शेखर कपूर ‘पाणी’ हा चित्रपट बनवण्यासाठी गुंतवणूकदारांना भेटले. मात्र ते पटकथा ऐकवत नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदार तयार होत नाहीत. ते एखाददुसरे दृश्य सांगतात. ऐकणाऱ्याला ते फारसे कळत नाही. शेखर हे देव आनंद यांचे भाचे. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट. लंडनमधील नोकरी सोडून मुंबईत शबाना आझमींच्या सहकार्याने ‘मासूम’ चित्रपट बनवला. हा अमेरिकन चित्रपटावर आधारित. चित्रपटाचे कौतुक झाले. निर्मात्यांना लाभ झाला. शबाना व जावेद अख्तर यांनी निर्माता बोनी कपूर यांना शेखर यांची शिफारस केली. मग तयार झाला श्रीदेवी आणि अनिल कपूरचा मि. इंडिया. त्यानेही बक्कळ नफा कमावला. त्यानंतर शेखर कपूर यांनी एकही चित्रपट पूर्ण केला नाही. शेखर यांचे मामा चेतन आनंद यांनी फ्योदोर दोस्तोव्हस्कीच्या ‘लोअर डेप्थ’ने प्रेरित होऊन ‘नीचा नगर’ बनवला. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी वितरक नव्हते. कोणाच्या तरी शिफारशीवरून पंडित नेहरूंनी चित्रपट पाहिला. प्रदर्शनाचे उत्तरदायित्व स्वीकारले. नेहरूंनी अलेक्झांडर कोरबांना शिफारस करून चित्रपट इंग्लंडमध्ये प्रदर्शित करवला. याबाबतची सर्व माहिती दोघांतील पत्रव्यवहारासह उमा आनंद यांचे पुस्तक ‘द पोएटिक्स ऑफ चेतन आनंद फिल्म्स’ या पुस्तकात उपलब्ध आहे. राजस्थानातील पाणी समस्येवर ख्वाजा अहमद अब्बास यांनी सिमी ग्रेवाल अभिनीत चित्रपट ‘दो बूंद पाणी’ बनवला होता.  चेतन आनंद यांच्या ‘नीचा नगर’मध्ये डोंगरावर राहणारी श्रीमंत व्यक्ती वस्तीवर राहणाऱ्या लोकांना पाण्यासाठी तरसायला लावते. डोंगरावर एका मोठ्या टँकमध्ये पाणीसाठा केलेला असतो. अमिताभ बच्चनच्या ‘मि. नटवरलाल’मध्ये याच प्रकारचे दृश्य आहे.  सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरत नाही. या तथाकथित विकासातच विनाशाचे बीज रोवले आहे. सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाणी जमिनीत मुरावे या साध्या गोष्टीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. कृषिप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या भारतात खूप कमी जमीन क्षेत्रावर शेती केली जात आहे. कृषी क्षेत्राचा विस्तार केल्यास अन्नधान्याचे प्रमाण वाढू शकते. वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन दिले जात आहे. त्या घरांना कमी कर लावला जात आहे. ही अतिशय सोपी प्रक्रिया. आशुतोष गोवारीकरांच्या ‘स्वदेश’मध्ये एक दृश्य आहे. बोटीवर स्वार लोक पाण्याजवळ असूनही तहानलेले. समुद्राच्या पाण्यालाही पिण्यायोग्य बनवले जाऊ शकते हे इस्रायलने दाखवून दिले. मात्र ही प्रक्रिया महागडी आहे. गरीब देशांना तिचा अवलंब करता येत नाही. पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग समुद्राने व्यापला आहे. आता विज्ञानच नवे समुद्रमंथन करू शकते. 

बातम्या आणखी आहेत...