आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांवर सुडबुद्धीने कारवाई; राहुल गांधींचा हल्लाबोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी ईडीच्या मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी शरद पवारांच्या समर्थनार्थ आले असून आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना सत्ताधाऱ्यांनी लक्ष केल्याचे मत मांडले. 
 

ही कारवाई म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय संधीवादाची पुनरावृत्ती -  राहुल गांध
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनार्थ आले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, सरकारकडून लक्ष्य केलेले शरद पवार हे विरोधी पक्षाचे नवे नेते आहेत. अशी कारवाई निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील राजकीय संधीवादाची पुनरावृत्ती असल्याचे राहुल गांधींनी ट्वीट केले. आज शरद पवार यांच्याबरोबर ईडीच्या चौकशीला विरोध वाढत आहे. निषेधाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाभोवती कार्यकर्ते दाखल होऊ शकतात. यामुळे या परिसरात 144 कलमान्वये जमावबंदी लागू करण्यात आले आहे.