आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकालेश्वर मंदिरात या अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, झपाट्याने व्हायरल होतोय व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैनः महाकालेश्वर मंदिरात विभत्स नृत्य करतानाचा एका तरुणीचा व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाला आहे. व्हिडिओत ही तरुणी साडीमध्ये विभत्स नृत्य करतानाचे चार व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. इतकेच नाही तर ही तरुणी मंदिरात गैरवर्तणूक करतानाही दिसत आहे. ही तरुणी मुंबईतील एक अभिनेत्री आणि मॉडेल असल्याचे समजले आहे.

 

मंदिरात कॅमेरा-मोबइलवर बंदी, मग कसे शूट झाले व्हिडिओ 

सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओवरुन बरीच टीका होत आहे. शिवाय मंदिर प्रशासनाच्या सतर्कतेवरुनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मंदिरात कॅमेरा आणि मोबाइलवर बंदी आहे, तर मग मंदिराच्या आवारात कॅमेरा कसा आणला गेला, यावरुन चर्चेला उधाण आले आहे. मंदिर समितीचे प्रशासक अभिषेक दुबे यांनाही नागरिकांनी हा व्हिडिओ पाठवला आहे. दुबे यांनी सांगितल्यानुसार, मला काही नागरिकांनी हा व्हिडिओ पाठवला असून याची चौकशी सुरु आहे. 

 

अॅपद्वारे पटली ओळख... 
या तरुणीच्या व्हिडिओ आणि फोटोवर नंदिनी कुरील लिहिले आहे. शिवाय टिक-टोक नावाच्या अॅपचाही त्यावर उल्लेख आहे. मंदिरा प्रशासनाच्या आयटी तज्ञांनी या अॅपच्या द्वारे तरुणीचा शोध घेतला असता, या अॅपवर तिचे तेच व्हिडिओ आणि फोटो दिसत आहेत. अॅपवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मुंबईची असून अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मंदिर प्रशासन मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून त्यामध्ये हा व्हिडिओ कधी तयार करण्यात आला, याची माहिती उघड होण्यास मदत होणार आहे.  
 

 

बातम्या आणखी आहेत...