आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसची कसाेटी पाहणारी निवडणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजदीप सरदेसाई   महाराष्ट्र विधानसभेसाठी हाेत असलेल्या राेमहर्षक निवडणुकीत काही बाबी पहिल्यांदाच हाेत आहेत. मराठाबहुल नागपूर मतदारसंघातून पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा निवडून येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. ठाकरे परिवारातून पहिल्यांदाच २९ वर्षांचा आदित्य थेट निवडणूक आखाड्यात उतरला आहे. पहिल्यांदाच शिवसेनेला धाकटा भाऊ ठरवत भाजपने युती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गेल्या ५० वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच घराणे आणि पक्ष दाेघांनाही एकसंध राखण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी प्रमुख पक्ष राहिलेल्या काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. काँग्रेसचे पतन आणि भाजपचा उत्कर्ष खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात प्रतिबिंबित झालेले पाहायला मिळते. या राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी केव्हाही ३०% पेक्षा कमी नव्हती. १९९५ मध्ये भाजप-शिवसेनेने अपक्ष आणि काही बंडखाेरांच्या बळावर सरकार स्थापन केले हाेते. २०१४ मध्ये  निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना सत्तेसाठी एकत्र आले. काँग्रेससाठी मजबूत बालेकिल्ला राहिलेल्या महाराष्ट्राला जागाेजाग खिंडारे पडली असून ताे ढासळण्याच्या बेतात आहे. कांॅग्रेसला पहिला धक्का ९० च्या दशकातील हिंदुत्ववादी युतीच्या राजकीय ध्रुवीकरणाने बसला. १९९९ मध्ये शरद पवारांनी दुसऱ्यांदा काँग्रेसपासून विभक्त हाेत असतानाच प. महाराष्ट्रातील अनेक युवा नेत्यांना साेबत नेले. तिसरा धक्का विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागास भागातील बिगर मराठा, आेबीसी घटकांनी भाजप-शिवसेनेशी संधान साधल्यामुळे बसला. त्यानंतर चाैथा धक्का दलित युवकांनी दिला. पारंपरिक अभिजन वर्गातील नेत्यांना स्वीकारण्यास नकार देत प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या पर्यायी नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशी जमवून घेणे दलित युवकांनी पसंत केले. या खेपेस मराठा नेत्यांकडून भाजपसाठी काँग्रेसला साेडचिठ्ठी देण्याचा निर्णय माेठा झटका मानला जात आहे. संख्याबळाच्या आधारावर मराठा समाज नेहमीच सत्ताशिखरावर राहिला. कैक दशकांपासून सत्ता आणि संसाधनांचा आपल्या हितासाठी ते वापर करीत हाेते. राजकीय प्रभुत्वासाठी मराठा समाजातच खरा संघर्ष हाेत राहिला, अन्य समाजघटक यापासून बरेच दूर हाेते. खुद्द इंदिरा गांधीदेखील मराठा समाजातील गटबाजीला वेसण घालण्यात यशस्वी ठरल्या नव्हत्या. मराठा नेत्यांना भाजपकडे वळवण्यासाठी फडणवीसांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर अवलंब केला. मराठा आरक्षणाची मागणी मान्य करून फडणविसांनी नाेकऱ्यांमध्ये पिछाडीवर राहत असलेल्या मराठा युवकांचे लक्ष वेधले. मराठा नेत्यांच्या अर्थतंत्राला लक्ष्य बनवले, प्रामुख्याने साखर, डेअरी उद्याेग, सहकारी बँकांतील नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. दिल्लीतील माेदी सरकारने स्वत:ला काँग्रेससारखे भासवून सत्तेचा चतुराईने वापर केला, त्याच धर्तीवर फडणवीसांनी महाराष्ट्रात काम केले. काँग्रेस आपली ताकद अंतर्गत गटबाजीवर खर्च करीत असताना, फडणवीस सरकारने मात्र राजकीय व्यवस्थापन काैशल्याचा अवलंब करीत विराेधकांना नेस्तनाबूत केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी काहीच भूमिका घेतली नसल्याने त्यांना साॅफ्ट टार्गेट केले गेले. शिवसेना थाेडाफार आवाज उठवत असल्याने भाजपने वेळीच मर्यादा आेळखल्या. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना फारसे अधिकार दिले नाहीत, किंबहुना शरद पवार यांनाही फारसे महत्त्व दिले नाही. मात्र भाजपने फडणवीस यांच्या मताला महत्त्व देत पुरेशी स्वायत्तता दिली. व्यक्तिनिष्ठ संचालन हाेत असलेला भाजप या निवडणूक काळात महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष बनला आहे. या निवडणुकीत भाजप बहुमत मिळवण्याच्या स्थितीत आहे. जर २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीला आम्ही माेदी निवडणूक म्हटले हाेते, तर महाराष्ट्रातील निवडणुकीला फडणवीस निवडणूक म्हटलेच पाहिजे. एका पत्रकार परिषदेत मी फडणवीसांना विचारले, विराेधी पक्षात असताना भाजपने ज्या नेत्यांना भ्रष्ट ठरवले हाेते, त्यांच्याशी हातमिळवणी कशी करू शकता? त्या वेळी फडणवीस म्हणाले,‘एकही नेता असा दाखवा ज्यास आम्ही सामावून घेतले आणि ज्याविरुद्ध ‘ईडी’ची काेणती केस असेल.’ भ्रष्टाचाराची अन्य प्रकरणे आता विसरा. असे वाटतेय की, ‘ईडी’ म्हणजे राजकीय अस्पृश्यतेचा नवा मानदंड ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...