Home | Business | Personal Finance | This bank is giving loans without interest; You can also get a loan

सरकार देत आहे दीड लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, अशा पद्धतीने करावे लागेल Apply

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 03:38 PM IST

या योजनेअंतर्गत विविध क्षेत्रात प्रगती करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा

 • This bank is giving loans without interest; You can also get a loan

  नवी दिल्ली- नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे स्किल वाढवायचे आहे परंतु त्यासाठी पैशांची गरज आहे? चिंता करु नका कारण आता सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट या योजनेअंतर्गत तरुणांना पाच हजारांपासून दीड लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून आपल्या क्षेत्रात प्रगती करु इच्छिणाऱ्या तरुणांना अनेक प्रकारच्या सुविधादेखील मिळणार आहे.

  या बँकेतून मिळवा कर्ज

  > या योजनेअंतर्गत तुम्हाला मेंबर लँडिंग इंस्टीट्यूशन (एमएलआय)मध्ये नोंदणी करावी लागते. या एमएलआय अंतर्गत तुम्ही खासगी क्षेत्रातील बँक, एसबीआय असोसिएट, कोऑपरेटिव्ह बँक, फॉरेन सेक्टर बँक, एनबीएफसी, स्थानिक बँक यांच्याकडून कर्ज घेऊ शकता.

  किती व्याजदरावर मिळेल कर्ज

  > या योजनेअंतर्गत एमएलआयच्या नियमांनुसार बँक या कर्जावर 1.5 टक्के व्याजदर आकारू शकते.

  या क्षेत्रातील तरुणांना मिळेल कर्ज

  > तुम्ही आयटीआय, पॉलिटेक्निक, सरकारमान्य शाळा किंवा विद्यापिठ, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशन, स्टेट स्किल मिशन या संस्थांमध्ये शिक्षण घेत असाल तर तुम्ही कर्जासाठी अर्ज भरु शकता.

  पुढील स्लाइडवर पाहा, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?


 • This bank is giving loans without interest; You can also get a loan

  > तुम्हाला संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी तुमचा आधार क्रमांक जमा करणे बंधनकारक आहे. तसेच तुमचे आतापर्यंतचे सिव्हील स्कोर चांगले राहणे आवश्यक आहे. 
   
   
  पुढील स्लाइडवर पाहा- कसा भराल अर्ज

 • This bank is giving loans without interest; You can also get a loan

  > तुम्ही क्रेडिट गॅरंन्टी फ्री स्किल डेव्हलपमेंट कर्ज घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला बँकेत संपर्क करावा लागेल. त्यानंतर खाली दिलेल्या लिंकवर अर्ज भरल्यानंतर तुम्ही या योजनेस पात्र असाल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते.

   

  http://https://www.pnbindia.in/downloadprocess.aspx?fid=dTBy9ogVw3/DJRhHhhDeTA==

Trending