आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Boy See Dead Peoples & Have A Great Sixth Sense, They Know Things They Should Not Know

मेलेल्या लोकांना पाहू शकतो हा मुलगा, त्याला काही असेही माहिती आहे जे नसायला हवे, आईने सांगितले भयावह सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूपोर्ट - अमेरिकेच्या न्यूपोर्टमध्ये राहणाऱ्या एका मुलाला मृत लोक दिसतात. तो त्यांच्याशी बोलतो देखिल. त्याच्या आईनेच हा खुलासा केला. या शक्तीमुळे त्याची आई प्रचंड घाबरलेली होती. येथे राहणाऱ्या ट्रिकिया जॉर्डनने सांगितले की, तिचा मुलगा लुका याला मृत लोक स्पष्ट दिसतात आणि अशा काही गोष्टीही त्याला माहिती असतात ज्या त्याला माहिती असायला नको. लुका अवघ्या दोन वर्षांचा असताना त्याच्या आईला याबाबत सर्व काही समजले होते. 


आजी दिसू लागली.. 
- ट्रिकियाने सांगितले की, लुका दीड वर्षांचा असताना त्याच्या आजीचा मृत्यू झाला झाला. काही महिन्यांतच तो विचित्र वागू लागला. एक दिवस तो म्हणाला की, त्याला सकाळी आजीने उठवले. ते ऐकूण ट्रिकिया चांगलीच घाबरली. कारण लुकाने तेव्हा बोलायलाही सुरुवात केली होती. 


आजीचे गाणे गाऊ लागला 
- काही दिवसांनी लुकाने त्याची आजी जे गाणे गायची ते गुणगुणने सुरू केले. लुका ते वारंवार गात होता. जेव्हा त्याच्या आईने ते गाणे ऐकले तेव्हा तिला धक्काच बसला कारण लुकाला या गाण्याबाबत फार काही माहिती नव्हती. हे गाणे त्याची आजी त्याच्या जन्मापूर्वी गात होती. 


एक जवस शेजारच्या घरातही कोणीतरी दिसले 
- लुका चार वर्षाचा झाला होता. त्यात काहीतरी शक्ती असल्याचे त्याच्या आईला समजले होते. त्याला मृत लोक दिसत होते. ट्रिकियाने याचा स्वीकार केला होता. त्याला जास्त चिंता नव्हती कारण लुकाला जराही भिती वाटत नव्हती. 
- एक दिवस आईबरोबर जाताना 4 वर्षांच्या लुकाने एका घरामोर गाडी थांबवली. गाडी थांबताच तो म्हणू लागला, या घरात मार्टिन नावाचा व्यक्ती राहतो. तो आगीत होरपळून मेला होता. मार्टिन अजूनही तेथेच राहतो असेही तो म्ङणाला. ते ऐकूण लुकाच्या आईने तिथून गाडी वेगात पुढे नेली. 
- त्याच्या आईने चौकशी केली तेव्हा हे सर्व खरे असल्याचे त्यांना समजले. 
- लुकाची आई म्हणाली की, मृत्यूनंतर आत्मा असतो यावर माझा विश्वास नव्हता. पण जे माझ्या मुलाबरोबर होत होते ते खरंच होत होते. मीही हैराण झाले होते. पण आत्मा असतो यावर माझा विश्वास बसला होता. 

बातम्या आणखी आहेत...