आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेसाठी मुलांना लवकर घेऊन गेला बस ड्रायव्हर, पण शाळेत पोहचलाच नाही; कारण समजताच सगळ्यांना बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मोंटेवेलो : अमेरिकेतील अलबामा राज्यात एक बस ड्रायव्हर मुलांना सकाळीच शाळेत नेण्यासाठी निघाला होता. पण तो शाळेत पोहचलाच नाही. त्यादिवशी मुलांना घेण्यासाठी तो लवकर गेला होता. काही तासांनंतर मुलांच्या पालकांनी शाळेत चौकशी केली असता मुले तिथे पोहोचले नसल्याचे शाळेने त्यांना सांगितले. यामुळे पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांना आपल्या मुलांचा चिंता वाटायला लागली. पण जेव्हा त्यांना मुले शाळेत न पोहोचण्याचे कारण माहीत झाले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

 

- अमेरिकेतील मोंटेवेलो येथे स्कूल बसच्या ड्रायव्हर वेन प्राइज याची ही गोष्ट आहे. तो मागील 5 वर्षांपासून येथील एलिमेंट्री शाळेत ड्रायव्हरची नोकरी करत आहे.  

 

- बस ड्रायव्हरला शाळेतून नुकतीच माहिती मिळाली होती की, परिसरात सुरू असलेल्या अति बर्फवृष्टीमुळे शाळा थोडी उशीरा सुरू होणार आहे आणि त्यामुळे मुलांना दुसऱ्या दिवशी नाश्ता देण्यात येणार नाही. 

 

- ड्रायव्हर रोज वेगवेगळ्या वर्गातील 50 मुलांना शाळेत सोडतो. त्याच्या बसमधील अनेक मुले गरीब कुटुंबातून होती आणि नाश्त्यासाठी शाळेवर निर्भर होते. 

 

- त्यादिवशी शाळेतून माहिती मिळताच वेनने स्वखर्चाने मुलांना नाश्ता करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुलांना घेण्यासाठी तो लवकर निघाला होता. सर्वांना घेऊन मार्गातील एका मोठ्या रेस्तराँमध्ये घेऊन गेला. 

 

- तेथे गेल्यानंतर त्याने बसमधील सर्व मुलांसाठी सँडविच आणि बिस्कीट खरेदी केले. यादरम्यान मुलांच्या पालकांची चिंती वाढली होती. पण ड्रायव्हरने शाळेत गेल्यावर सगळी हकिकत सांगिल्यानंतर सर्वांना आनंद झाला होता. 

 

- मुलांच्या उशीरा पोहोचण्याचे कारण समजल्यानंतर त्यांच्या पालकांनी खूप आनंद झाला होता. ही गोष्ट माहीत झाल्यानंतर अनेक पालकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांनी याबाबत शाळा व्यवस्थापनेला सांगितले. त्यानंतर शाळेने आपल्या फेसबुक अकाउंटवर ही घटना शेअर केले. 

 

- मी कोणतेही मोठे काम केले नाही. या मुलांसोबत नाश्ता करताना मी माझ्या परिवारासोबत जेवण करत असल्याचा खास अनुभव मला मिळाला. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर हे काम केल्यामुळे मला आनंद झाला असल्याचे ड्रायव्हरने सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...