आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्सच्या काळात महिला कर्मचाऱ्यांना मिळणार सुटी, नवीन वर्षापासून होणार अंमलबजावणी; या कंपनी सुरू केला उपक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कोलकाता : कोलकाता येथील डिजिटल मीडिया कंपनीने महिलांसाठी नवीन वर्षापासून एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. फ्लायमायबिज कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना पीरियड्सच्या काळात एका दिवसाची सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या मते, 2019 पासून पीरियड्सच्या काळात प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला एका दिवसाची सुटी मिळणार आहे. 

 

कर्मचाऱ्यांचे समाधान हाच आमचा आनंद - सीईओ
कंपनीचे संस्थापक-सीईओ सामयो दत्ता यांनी सांगितले की, माझ्या कंपनीतील सर्व महिला कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात एक अतिरिक्त सुटी मिळणार आहे. जानेवारी 2019 पासून 12 अतिरिक्त सुट्ट्या मिळणार आहेत. या सुट्टा वर्षातील इतर सुट्टा वगळून असतील. त्यांनी पुढे बोलताना म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे समाधान हे आमचे कर्तव्य आहे. ते जर समाधानी झाले तर मला पण आनंद होईल. पीरियड्सच्या काळात महिलांना किती मानसिक आणि शारिरीक त्रास सहन करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरीही कोणी या काळात त्यांची मदत करण्यास पुढे येत नाही. 
 

कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद

सीईओने घेतलेल्या या निर्णायामुळे कंपनीत काम करणाऱ्या महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरुष कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याआधी चीन, जपान, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियात अशाप्रकारची सुटी देण्यात आली आहे. तर इटली येथील सरकार आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी पीरियड्स दरम्यान तीन दिवसांची पगारी रजा देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...