आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियात 2018 मध्ये मृत्यूदंड देण्याच्या प्रमाणात 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. या देशात 2017 मध्ये 153 जणांना मृत्यूदंड देण्यात आला. दरवर्षी मृत्यूदंडाच्या आकडेवारीत वाढ होत असताना दिसून येत आहे. सौदी अरेबियात कठोर इस्लामिक कायदे आहेत. यात मर्डर, अमली पदार्थांची तस्करी, बलात्कार आणि दरोड्याच्या गुन्ह्यांसाठी थेट शिरच्छेद केला जातो. अॅमनेस्टी इंटरनॅशनलने सुद्धा या शिक्षेची वाढती संख्या आणि एकूणच त्याच्या पद्धतीवर वेळोवेळी चिंता व्यक्त केली.
शिरच्छेद करून दिला जातो मृत्यूदंड
सौदी अरेबियात 2015 मध्ये 158 जणांना मृत्यूदंड देण्यात आला होता. गतवर्षी 153 जणांना शिरच्छेद करून हा दंड देण्यात आला आहे. 2017 मध्ये सुरुवातीलाच 47 जणांना दहशतवादाच्या आरोपाखाली मृत्यूदंड देण्यात आला होता. त्यामध्ये शिया धर्मगुरू निम्र अल निम्र यांचाही समावेश होता. 2018 मध्ये मृत्यूदंड मिळवणाऱ्यांमध्ये बहुतांशी अमली पदार्थ तस्करांचा समावेश होता. त्यांना जमावासमोर आणून शिरच्छेद करण्यात आले होते. सौदीत कोण-कोणत्या गुन्ह्यांसाठी कशा स्वरुपाची शिक्षा दिली जाते, हे पुढील स्लाइड्सवर इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून पाहा...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.