आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Decade's Wisden Team Includes Dhoni, Kohli; The Four Indian Players Together In Both Categories

या दशकाच्या विस्डेन टीममध्ये धोनी, कोहलीचा समावेश; दोन्ही प्रकारात मिळून चार भारतीय खेळाडूंचा समावेश

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लंडन : क्रिकेटचे बायबल म्हटल्या जाणाऱ्या मॅगझिन विस्डेनने मंगळवारी आपल्या टीम ऑफ द डिकेड' म्हणजे दशकातील टीमची घोषणा केली. कसोटी व वनडे मिळून चार भारतीय खेळाडूंची निवड त्यात केली. यात कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार व यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी, फिरकीपटू आर. अश्विन व फलंदाज रोहित शर्माचा समावेश आहे. यात विराटला एकट्याला दोन्ही संघांत स्थान मिळवले. धोनी व रोहितची नावे वनडेे संघात तर अश्विनचे नाव कसोटी संघात आहे.

ही टीम संपूर्ण दशकाच्या (२०११ पासून आतापर्यंत) कामगिरीवर निवडली आहे. कोहलीसह ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, द. आफ्रिकेचा डिव्हिलर्स व डेल स्टेनची नावे दोन्ही संघांत आहेत. आधुनिक क्रिकेटमध्ये कोहलीच्या बरोबरीचा मानल्या जाणारा स्टीव्ह स्मिथचे केवळ कसोटीत आहे.
विराट, वॉर्नर, एबीडी व डेल स्टेन दोन्ही संघामध्ये

क्रिकेेट ऑस्ट्रेलियाचा वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही आपल्या दशकातील टीम निवडली. यात दोन्ही संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडूंच्या हाती दिले. धोनीची वनडे टीम व विराटला कसोटी संघाचा कर्णधार बनवले. त्यासह रोहित शर्माचा वनडे संघात समावेश आहे. दोन्ही प्रकारांत मिळून तीन भारतीय खेळाडूंची नावे आहेत.

विस्डेन कसोटी

अॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, संगकारा, स्टीव्ह स्मिथ, कोहली, बेन स्टोक्स, डिव्हिलर्स, अश्विन, डेल स्टेन, कगिसो रबाडा, जेम्स अँडरसन. विस्डेन वनडे : रोहित शर्मा, कोहली, डेव्हिड वॉर्नर, डिव्हिलर्स, जोस बटलर, शाकिब अल हसन, धोनी, मलिंगा, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, स्टेन.

कसोटी संघ

विराट (कर्णधार), कुक, वॉर्नर, विलियम्सन, स्मिथ, एबीडी, स्टोक्स, स्टेन, ब्रॉड, नाथन लायन, अँडरसन. वनडे टीम : धोनी (कर्णधार), रोहित, हाशिम अमला, विराट, डिव्हिलर्स, शाकिब, जोस बटलर, राशिद खान, मिचेल स्टार्क, बोल्ट, मलिंगा.

 

बातम्या आणखी आहेत...